'खेड' तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार
By admin | Published: November 1, 2016 12:45 PM2016-11-01T12:45:02+5:302016-11-01T12:46:20+5:30
आळंदी नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. १ - आळंदी नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर भगवा ध्वज हातात घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, माजी नगरसेवक रमेश गोगावले, महिला आघाडी तालुकसंघटक नंदा कड, उपतालुकाप्रमख किरण गवारे, सुभाष मांडेकर, महादेव लिंभोरे आदींच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा समारंभ संपन्न झाला. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, शिक्षणमंडळ सभापती श्रीधर कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील, भाग्यश्री रंधवे पाटील, मनोज कुऱ्हाडे, युवानेते संदीप कायस्थ,ज्ञानेश्वर
कु-हाडे आदींसह १०० हून अधिक श्री क्षेत्र आळंदी व परिसरातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वाकी - पाईट जिल्हा परिषद गटातील डॉ. प्रमोद कुबडे यांनीदेखील अनेक समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. काळूसचे माजी सरपंच केशव अरगडे, माजी सरपंच दत्तात्रय टेमगिरे, माजी सरपंच अर्चना टेमगिरे, ग्रा. पं . सदस्य अनिल अरगडे, रुपेश अरगडे, श्रीकांत पोटवडे , निखिल पवळे, ग्रा. पं. सदस्या विजया पोटवडे यांनीदेखील यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच खेड आदिवासी भागातील वाळद गावाचे माजी सरपंच भगवानराव पोखरकर यांच्यासह सुमारे २०० समर्थकही आता शिवसेनेत आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.
नगरपरिषद व जिल्हा परिषद,पंचायत समितीची निवडणूक जवळ आली असताना इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे.