गणोशाच्या रूपात खंडोबा

By Admin | Published: August 6, 2014 12:35 AM2014-08-06T00:35:31+5:302014-08-06T00:35:31+5:30

संदर्भ घेऊन मूर्तीला आकार देणो हे कालांतराने कमी होत जाऊन नवनवीन ‘क्रेझ’च्या शोधात मूर्तीकार व गणोशभक्त असतात.

Khandoba as Ganoshha | गणोशाच्या रूपात खंडोबा

गणोशाच्या रूपात खंडोबा

googlenewsNext
पंढरीनाथ कुंभार - भिवंडी
गणपतीच्या कथेला अनुसरून मूर्ती बनविणो अथवा इतर ऐतिहासिक दाखले व संदर्भ घेऊन मूर्तीला आकार देणो हे कालांतराने कमी होत जाऊन नवनवीन ‘क्रेझ’च्या शोधात मूर्तीकार व गणोशभक्त असतात. त्यानुसार यंदा खंडोबाच्या रूपातील गणपतीच्या मूर्तीची ‘क्रेझ’ मार्केटमध्ये निर्माण झाली असून या आकारातील मूर्तींची मागणी  दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतीय संस्कृतीत मूर्तीपूजेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मूर्तीपूजा ही धार्मिक भावनेशी जोडली गेली असली तरी हजारो मूर्तीकारांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असतो. वर्षभर गणपतीच्या कारखान्यात मूर्ती बनतात परंतु,  कृष्णजन्माष्टमीपासून या कामांचा वाढलेला वेग नवरात्रीर्पयत कायम असतो. या काळात मातीला देवत्वाचा आकार देताना मूर्तीकाराचे जे कौशल्य पणाला लागते ते पूजकाला अथवा साधकाला प्रसन्न करणारे ठरते. पूर्वी बालगणोश पासून शंकर पार्वतीसोबत विविध प्रासंगिक मूर्ती बनत होत्या. त्यानंतर पौराणिक कथेवर आधारीत अथवा इतर देवांच्या व संतांच्या रूपातील गणोशाच्या मूर्तीना मागणी होती. परंतु, या वर्षी गणोश भक्तांना आकर्षित करण्यासाठी मूर्तीकारांनी खंडोबाचे प्रतिरूप गणोशमूर्तीना दिल्याने, अशा मूर्तीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
मूर्ती निर्मितीसाठी वापरात येणारे साहित्य, माती,प्लास्टर, भुसा, लाकूड, बांबू, लोखंडी अॅन्गल व रंग आदिंच्या किंमतीत 2क् ते 3क् टक्क्यांनी वाढ झालेली आहे. प्लास्टरची बॅग 185 वरून 2क्क् ते 25क् रूपयांना मिळू लागली. काथा बंडल 9क्क् वरून 15क्क् ते17क्क् रूपयांना मिळू 
लागला. त्यामुळे यंदा मूर्तीच्या किंमतीत 2क् ते 3क् टक्के भाववाढ होणार असल्याचे मूर्तीकारांकडून सांगितले जाते.  प्लास्टरच्या मूर्ती आकर्षित करीत असल्या तरी  कारखान्यात मात्र मातीची अथवा इकोफ्रेन्डली मूर्तीची विचारणा होऊ लागली आहे.
 
4मूर्ती निर्मितीसाठी वापरात येणारे साहित्य, माती,प्लास्टर, भुसा, लाकूड, बांबू, लोखंडी अॅन्गल व रंग आदिंच्या किंमतीत 2क् ते 3क् टक्क्यांनी वाढ झालेली आहे. प्लास्टरची बॅग 185 वरून 2क्क् ते 25क् रूपयांना मिळू लागली. काथा बंडल 9क्क् वरून 15क्क् ते17क्क् रूपयांना मिळू  लागला. यंदा मूर्तीच्या किंमतीत 2क् ते 3क् टक्के भाववाढ होणार.

 

Web Title: Khandoba as Ganoshha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.