खार जिमखान्याचे योगदान कौतुकास्पद - शरद पवार
By Admin | Published: June 20, 2016 06:52 PM2016-06-20T18:52:41+5:302016-06-20T18:52:41+5:30
खार जिमाखाना आणि सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धा यांचे जुने नाते आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट हे खार जिमखान्याशिवाय अपूर्ण असून खार जिमखान्याचे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - खार जिमाखाना आणि सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धा यांचे जुने नाते आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट हे खार जिमखान्याशिवाय अपूर्ण असून खार जिमखान्याचे क्रिकेटमधील योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
खार जिमखाना येथे ७५ व्या सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्धाटन समारंभात शरद पवार बोलत होते. यावेळी ३९ व्या १६ वर्षांखालील भगुबाई खिचाडीया आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडला. याप्रसंगी एमसीएचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर उपस्थित होते.
सेठ गोधर्नदास करसनदास ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेच्या सांघिक गटाची अजिंक्य ढाल कांदिवलीच्या क्रिकेट असोसिएशने पटकावली. तर बोरीवलीच्या कांदिवलीच्या अमर क्रिकेट क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक गटातील सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाजाच्या पुरस्कारावर कांदिवलीच्या अनुक्रमे इर्फान खान आणि पार्थ शहा यांनी नाव कोरले. अमरच्या उमंग सेथची अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णी लागली. ३९ व्या १६ वर्षांखालील भगुबाई खिचाडीया आतंर शालेय क्रिकेट स्पर्धेत वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कुलने विजय मिळवला. तर बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेला उपविजेते पद मिळवले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलूच्या बक्षीस अनुक्रमे शोएब सिद्दीकी, हेम पटेल, राहूल केसरी यांनी मिळवले.