खारघरला ४५ लाख पकडले

By admin | Published: December 28, 2016 01:21 AM2016-12-28T01:21:26+5:302016-12-28T01:21:26+5:30

जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणाऱ्या रॅकेटच्या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या

Kharghar caught 45 million | खारघरला ४५ लाख पकडले

खारघरला ४५ लाख पकडले

Next

नवी मुंबई : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणाऱ्या रॅकेटच्या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या २२५० नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेले सर्व जण खारघर व तळोजा परिसरातील राहणारे आहेत.
त्याठिकाणी सरकारने बंदी घातलेल्या जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष तीनला मिळाली होती. यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उत्तम दुंदळे, प्रतापराव कदम, श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक सुनील सावंत यांच्या पथकाने सोमवारी त्याठिकाणी सापळा रचला होता.
खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रथमेश अपार्टमेंटमधील कार्यालयावर छापा टाकला असता, त्याठिकाणी पाच जण होते. झडतीमध्ये त्याठिकाणी ४५ लाख रुपये किमतीच्या दोन हजार रुपयांच्या २२५० नव्या नोटा आढळून आल्या. परंतु या नोटांसंबंधी त्यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण मिळू शकले नसल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. त्यानुसार जयदास तेलवणे (३४), सुरेश पाठक (३२), इक्बाल पटेल (४६), महेश पटेल (३१) व जुबेर पटेल (४०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व जण खारघर व तळोजा परिसरातील राहणारे असून दूध विक्री, रेती सप्लायर तसेच कॉन्ट्रॅक्टर असा त्यांचा व्यवसाय आहे.
१ कोटी रुपयांच्या नोटा बदलीसाठी १२ टक्के कमिशन घेवून त्यांच्याकडून काळ्याचे पांढरे करण्याचे रॅकेट चालवले जात होते. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा आल्या कुठून याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. त्याशिवाय या रॅकेटमध्ये अजून इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी त्यांनी कोणाला नोटा बदलून दिल्या आहेत का ? याचाही अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)

पी.ए.टी. इन्फ्रा अ‍ॅग्रो कार्यालयातून रॅकेट
जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटांकरिता एक कोटी रुपयांसाठी १२ टक्के कमिशन घेऊन काळ्याचे पांढरे करणाऱ्या रॅकेटच्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खारघर सेक्टर १९ येथील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये पी.ए.टी. इन्फ्रा अ‍ॅग्रो नावाच्या कार्यालयातून हे रॅकेट चालवले जात होते.

Web Title: Kharghar caught 45 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.