‘खाशाबा जाधव कुस्ती संकुल लवकरच उभारू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:48 AM2017-07-27T03:48:14+5:302017-07-27T03:48:17+5:30
कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुल लवकर उभे केले जाईल,’ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. ‘लोकमत’ने नियोजित संकुलाच्या रखडलेल्या प्रस्तावाविषयी दोन
सातारा : ‘कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुल लवकर उभे केले जाईल,’ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. ‘लोकमत’ने नियोजित संकुलाच्या रखडलेल्या प्रस्तावाविषयी दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिध्द करताच बुधवारी विधान परिषदेत यावर चर्चा झाली.
आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारल्या जाणाºया कुस्ती संकुलासाठी गेल्या आठ वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे जाधव कुटुंबीय उद्विग्न झाले असून ‘खाशाबा जाधव यांनी आॅलिम्पिकमध्ये देशाला मिळवून दिलेले पहिले पदक लिलावात काढा’, अशी मागणी खाशाबांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केली होती. आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करुन नियोजित कुस्ती संकुलासाठी तातडीने निधी वर्ग करुन काम सुरू करण्याची मागणी केली.