वाशिममध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबाच्या घरावर ‘खतरा’
By admin | Published: August 26, 2016 06:03 PM2016-08-26T18:03:19+5:302016-08-26T18:03:53+5:30
जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुबांच्या घरावर खतरा (लालस्टीकर) लावण्याच्या अभिनव अभियानाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.26 - जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुबांच्या घरावर खतरा (लालस्टीकर) लावण्याच्या अभिनव अभियानाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत २६ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव या गावातील कुटुंबांना भेटी दिल्या आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांनी लाल स्टिकर (खतरा/धोका) लाऊन शौचायल बांधण्याची विनंती केली.
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनने एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, शौचालय नसलेल्या कुटुंबांना ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना त्यावर लाल शिक्का मारण्याचा , तसेच त्या दाखल्यावर विना शौचालय असे लिहिण्याचा निर्णय जि.प.च्यावतीने घेण्यात आला होता. या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करण्यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने जनजागृतीची मोहिमही सुरू केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ही संकल्पना सांगितली होती.या उपक्रमांतर्गत स्वच्छता कक्षाने दोन प्रकारचे शिक्के बनविले. ज्यांच्याकडे वापरातील शौचालय आहे त्यांच्या घरावर हिरव्या रंगातील शौचालयासह व ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही व जे
कुटुंब उघड्यावर शौचास जातात त्यांच्या कागदपत्रांवर लाल रंगातील शिक्का मारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना अशा प्रत्येकी दोन शिक्क्यांचे व एका पॅडचे वितरणही करण्यात आले आणि याबाबत सर्व गटविकास अधिका-यांना सूचनाही दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. आता जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने २२ आॅगस्ट पासून जिल्हाभर भेटी गाठी- स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येणाºया २ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबांना भेटी देण्यात येणार आहेत. या मोहिमेला जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी चांगली गती दिली असून, प्रत्यक्ष गावात जाऊन घरोघरी शौचालय बांधायचे आवाहन ते करीत आहेत. याच अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील कुटुंबस्तर संवादासाठी घेतलेल्या भेटीदरम्यान जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरावर खतरा लिहिलेले (विना शौचालय) लाल स्टीकर लावण्याची मोहिमही राबविली.