अखेर खडसेंना मिळाले ‘रामटेक’!
By admin | Published: November 20, 2014 02:29 AM2014-11-20T02:29:12+5:302014-11-20T02:29:12+5:30
‘रामटेकह्ण बंगल्याकरिता महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु होती.
मुंबई : ‘रामटेकह्ण बंगल्याकरिता महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर आता या बंगल्यावर आपलं चंबुगबाळ घेऊन खडसे दाखल होणार हे स्पष्ट झाले आहे. तसे आदेश राज्य शासनाने काढले असल्याचे समजते.
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे अन्य मंत्र्यांपेक्षा ४०० चौ.फू.ने मोठे असलेले दालन कुणाला मिळणार याबाबतचे वाद या दालनावर खडसे यांनी ताबा मिळवल्याने संपला. त्यानंतर ‘वर्षाह्ण या मुख्यमंत्र्यांच्या या बंगल्यानंतर प्रशस्त व आलिशान अशी ओळख असलेल्या ‘रामटेकह्ण बंगल्याचा ताबा कुणाला मिळणार याबाबत चर्वितचर्वण सुरु होते. या बंगल्यात उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव होते. त्यामुळे वडीलांच्या आठवणी निगडीत असलेल्या या बंगल्यावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दावा केला होता, असे कळते.