खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचं झालं कडेकोट बंदोबस्तात प्रकाशन

By Admin | Published: October 12, 2015 06:30 PM2015-10-12T18:30:45+5:302015-10-12T19:11:06+5:30

स्वातंत्र्यसैनिकांनी स्वप्न बघितलं होतं तशी फाळणी झाली नसून त्यावेळी झालेल्या चुका undo करणं हे आपलं काम आहे असं सांगत, ऑर्गनायझर रीसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी कडेकोट बंदोबस्तात

Khurshid Kasuri's book was published in a tight court | खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचं झालं कडेकोट बंदोबस्तात प्रकाशन

खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचं झालं कडेकोट बंदोबस्तात प्रकाशन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - स्वातंत्र्यसैनिकांनी स्वप्न बघितलं होतं तशी फाळणी झाली नसून त्यावेळी झालेल्या चुका undo करणं हे आपलं काम आहे असं सांगत, ऑर्गनायझर रीसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी कडेकोट बंदोबस्तात खुर्शीद कसुरी यांच्या नायदर अ हॉक नॉर अ डव्ह या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. शिवसेना हा कार्यक्रम उधळणार का व कसा याकडे सगळ्या भारताचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड बंदोबस्त पुरवला आणि कार्यक्रम व्यवस्थित सुरू झाला.
नसीरुद्दिन शाह, दिलीप पाडगावकर आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला. वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्रत झालं असून शिवसैनिकांना कार्यक्रम उधळण्याची संधीच दिली गेली नसल्याचं दिसून आलं.
मुंबई महाराष्ट्राची आहे, तशीच ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी या शहराचं चरीत्र भिन्न भिन्न गोष्टांना एकत्र सामावून घेणारं आहे, आणि विविधतेतून एकता हे या शहराचं ब्रीद असल्याचं कुलकर्णी म्हणाले.

Web Title: Khurshid Kasuri's book was published in a tight court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.