मुलाने केली वडिलांची हत्या

By Admin | Published: March 7, 2017 03:33 AM2017-03-07T03:33:59+5:302017-03-07T03:33:59+5:30

वडील ओरडल्यामुळे संतापलेल्या १८ वर्षांच्या तरुणाने त्यांचीच चाकूने हत्या केल्याची घटना कोळेगावात रविवारी रात्री घडली.

Kid father kills father | मुलाने केली वडिलांची हत्या

मुलाने केली वडिलांची हत्या

googlenewsNext


कल्याण : जेवण आणि मोबाइलवर गाणी ऐकण्यावरून वडील ओरडल्यामुळे संतापलेल्या १८ वर्षांच्या तरुणाने त्यांचीच चाकूने हत्या केल्याची घटना कोळेगावात रविवारी रात्री घडली.
दिगंबर वानखेडे हे कोळेगावातील वनवास पाटील चाळीत राहत होते. रविवारी रात्री ते दारू पिऊन घरी परतल्यानंतर त्यांनी पत्नी आशाला जेवण वाढण्यास सांगितले. या वेळी मोबाइलवर गाणे ऐकत बसलेला त्यांचा मुलगा अविनाशही त्यांच्यासोबत जेवायला बसला. त्यामुळे वानखेडे यांना राग आला. अविनाशला त्यांनी जेवला असतानाही परत जेवायला का बसतोस, असा प्रश्न विचारला. तसेच मोबाइलवर गाणी ऐकतो आणि सकाळी ८ वाजेपर्यंत झोपून राहतो, असे सुनावले.
या वेळी पितापुत्रामध्ये वादविवाद झाला. त्या वेळी वानखेडे यांनी अविनाशला धाक दाखवत जमिनीवरील विळी उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा तोल गेला. त्याच वेळी अविनाशने चाकूने वडिलांवर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर तेथून अविनाश पळून गेला. याप्रकरणी आई आशा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अविनाशविरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक बी.एम. साळुंके तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kid father kills father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.