गुप्तधनाच्या आमिषाने अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 01:24 AM2016-07-16T01:24:14+5:302016-07-16T01:24:14+5:30
नागपूर : गुप्तधनाच्या लालसेने अकोल्यातील एका व्यक्तीचे अपहरण करून नागपुरात आणण्यात आले. एक आठवडा झाला तरी तो व्यक्ती घरी न परतल्याने किंवा त्या
अकोल्यातील व्यक्ती बेपत्ता : नरबळीचा मुलाने घेतला संशय
नागपूर : गुप्तधनाच्या लालसेने अकोल्यातील एका व्यक्तीचे अपहरण करून नागपुरात आणण्यात आले. एक आठवडा झाला तरी तो व्यक्ती घरी न परतल्याने किंवा त्याचा कोणताच पत्ता लागत नसल्याने त्याचा नरबळी देण्यात आल्याची शंका घेऊन कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
या खळबळजनक प्रकरणाची सुरूवात मालेगाव येथून ९ जुलैला झाली. अकोला येथील रतन खंडारे याला आरोपी ताराचंद बोहरे अकोला, इंदू नामदेव अंबोरे, राजू गोरले आणि गजानन नावाचा अन्य एक व्यक्ती अशा चौघांनी ९ जुलैला नागपुरात आणले. त्यानंतर त्याचे काय झाले ते कळायला मार्ग नाही. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने रतनचा गुप्तधनासाठी नरबळी देण्यात आला असावा, अशी शंका घेत त्याचा मुलगा आकाश खंडारे याने आज सायंकाळी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शून्य क्राईमी करून हे प्रकरण मालेगाव पोलिसांना सोपवण्याची तयारी चालवली आहे.