चार वर्षीय बालिकेचे खंडणीसाठी अपहरण
By admin | Published: November 20, 2014 01:00 AM2014-11-20T01:00:44+5:302014-11-20T01:00:44+5:30
चार वर्षीय बालिकेचे शाळेतून अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच पैशाच्या वादातून
आठ लाखांची मागणी : वडिलांच्या मित्रानेच रचला अपहरणाचा कट
ब्रह्मपुरी : चार वर्षीय बालिकेचे शाळेतून अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच पैशाच्या वादातून तिचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्थानिक ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेली शिवानी मोहन गजबे हिला शाळेतून सुटी झाल्यावर अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले. नेहमीप्रमाणे वडील तिला घेण्यासाठी शाळेत आले. मात्र त्यांना ती दिसली नाही. काही वेळातच मोहन गजबे यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमांनी आठ लाखाची मागणी केली. यामुळे शिवानीचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले. पालक तसेच वर्गशिक्षिकेने पोलीस ठाण्यात जाणून तक्रार केली. ठाणेदार किशोर नगराळे यांनी तपास सुरु केला.
दरम्यान ज्या मोबाईलवरून शिवानीच्या वडिलांना फोन आला होता त्याचे लोकेशन पोलिसांनी शोधले असता वडसा परिसरात लोकेशन मिळाले. दरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता शिवानीच्या वडिलासोबत काही वर्षापूर्वी कपिलेंद्र ठाकूर याने व्यवसाय सुरु केला होता. मात्र तो व्यवसाय बंद करण्यात आला.
बालिकेला तुळशी कोकडी येथे नेऊन ठेवल्याची माहिती कपिलेंद्रने पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)