कुरडयातून विषबाधा जीवाणूंमुळेच!

By admin | Published: April 4, 2015 04:17 AM2015-04-04T04:17:30+5:302015-04-04T04:17:30+5:30

झोलंबा गावात काही दिवसांपूर्वी कुरडया व पापड्यांमधून विषबाधा झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता़ ही बाधा ‘प्लास्टोडिअम क्लोस्ट्रीडियम बोटॅलियम स्पोर फॉर्मिंग

Kidney poisoning caused by bacteria! | कुरडयातून विषबाधा जीवाणूंमुळेच!

कुरडयातून विषबाधा जीवाणूंमुळेच!

Next

संजय खासबागे, वरूड (जि़ अमरावती)
झोलंबा गावात काही दिवसांपूर्वी कुरडया व पापड्यांमधून विषबाधा झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता़ ही बाधा ‘प्लास्टोडिअम क्लोस्ट्रीडियम बोटॅलियम स्पोर फॉर्मिंग’ या प्रजातीच्या जीवाणूमुळे झाल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे़ तथापि, फॉरेन्सिक लॅब आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल़, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे़
आरोग्य विभागाच्या पथकाने सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर अन्नातील तीव्र विषबाधेचाच हा प्रकार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. गहू आंबवून त्याचा चिक काढून कुरडया करण्याची पद्धत आहे. आंबविण्याची प्रक्रिया अधिक काळ झाल्याने त्यामध्ये ‘प्लास्टोडिअम क्लोस्ट्रीडीयम बोटॅलियम’ प्रजातीचे जीवाणू निर्माण झाले असावेत. त्यामुळेच चिकापासून तयार केलेल्या कुरडया आणि नंतर शिल्लक असलेल्या आम्लयुक्त द्रावणात ज्वारीचे पीठ मळून तयार केलेले धापोडेही विषाक्त झाले असतील.
परिणामी पाच जणांसह श्वानाच्या पिलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय पथकाने व्यक्त केला

Web Title: Kidney poisoning caused by bacteria!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.