बिल्डरला धमकावणारा खाटीक गजाआड

By Admin | Published: August 8, 2015 01:47 AM2015-08-08T01:47:08+5:302015-08-08T01:47:08+5:30

गँगस्टर छोटा शकीलच्या नावे पश्चिम उपनगरातील एका बडया बिल्डरला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या अहमद आदम शेख या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी

Killer goose-throwing threatening the builder | बिल्डरला धमकावणारा खाटीक गजाआड

बिल्डरला धमकावणारा खाटीक गजाआड

googlenewsNext

मुंबई : गँगस्टर छोटा शकीलच्या नावे पश्चिम उपनगरातील एका बडया बिल्डरला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या अहमद आदम शेख या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. शेख हा खाटीक असून तो स्पूफ कॉल करून बिल्डरला धमकावत होता.
शेख आणि त्याच्या बेरोजगार मित्राने आधी बिल्डरची इत्यंभूत माहिती काढली. त्यानंतर त्याला शकीलच्या आॅफिसमधून वसीम बोलतोय असे सांगून पाच कोटींच्या खंडणीसाठी धमक्या देण्यास सुरूवात केली. बिल्डरच्या एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर शेख धमकीचे फोन करत होता.
विशेष म्हणजे फोन केल्यानंतर कर्मचाऱ्याला फोन करणाऱ्याच्या नंबरऐवजी स्वत:चाच नंबर दिसत होता. यामुळे बिल्डर आणखी घाबरला. त्याने तातडीने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच खंडणीविरोधी पथकाकडेही अर्ज सादर केला. वरिष्ठ निरिक्षक विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संपूर्ण पथक या गुन्हयाची उकल करण्यासाठी धडपडू लागले.
स्पूफ कॉलींगमुळे सुरूवातीला पथकाच्या हाती काही लागत नव्हते. मात्र पथकाने अथक परिश्रम करून शेख व त्याच्या साथीदाराची ओळख पटवली. त्यापैकी शेख याला अटक करण्यात आली. तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
स्पूफ कॉलींगची शाळा फरार आरोपीने शेखला शिकवली होती. बिल्डरला फोन करण्याआधी धमकीचे संवाद काय असावेत हे फरार आरोपी शेखला लिहून देई. तसेच हे संवाद कोणत्या अंदाजात फेकायचे तेही समजावून सांगे, अशी माहिती शेखने चौकशीत पोलिसांना दिल्याचे समजते. शेखची गुन्हेगारी पार्श्वभुमी पोलीस पडताळून पाहात आहेत. दरम्यान न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Killer goose-throwing threatening the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.