असा साकारला मोहेंजो दडो

By admin | Published: August 13, 2016 02:29 PM2016-08-13T14:29:02+5:302016-08-13T14:29:02+5:30

एखाद्या पुरातन किंवा ऐतिहासिक विषयावर चित्रपट निर्मित करायचा म्हटले तर त्यात अचूकता व संदर्भ या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात

This kind of moralejo dado | असा साकारला मोहेंजो दडो

असा साकारला मोहेंजो दडो

Next
>राहूल शिंदे, ऑनलाइन लोकमत
पुणे : एखाद्या पुरातन किंवा ऐतिहासिक विषयावर चित्रपट निर्मित करायचा म्हटले तर त्यात अचूकता व संदर्भ  या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मोहेंजो दडो हे सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेले महत्त्वाचे शहर.त्यावर दिग्दर्शक अशुतोष गोवरिकार यांनी मोहोंजो दडो हा चित्रपट साकारलेला असला तरी फार कमी लोकांना हे माहिती असेल की; पुण्यातील डेक्कन कॉलेज व गुजरातमधील पुरातत्त्व अभ्यासकांच्या मार्गदर्शनातून चित्रपटाचा कॅनव्हास उभा राहिला आहे.
 
एखाद्या साहित्याकृत्तीवर चित्रपट साकार कराताना दिग्दर्शक काही प्रमाणात स्वातंत्र घेत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, ऐतिहासिक घाटना व पात्र आणि विषयांवर एखादी चित्रकृती तयार करायची म्हटल्यास वाद नक्कीच वाद उद्भ्वू शकतात. कारण अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये संदर्भ व अचूकता महत्त्वाची असले. कदाचित याच गोष्टी टाळण्यासाठी आणि विषयात परिपूर्णता येण्यासाठी गोवारिकर यांनी पुरातत्त्व अभ्यासक्रांकडून मार्गदर्शन घेवून मोहेंजो दडो शहराची रचना तसेच तत्कालीन नागरिकांचा पोषाख, समाज रचना, प्राणी, दागिणे, हत्यारे, वाद्य,पूजा विधी आदी बाबी समजून घेतल्या. त्यानंतरच चित्रपटाची संहिता तयार केली आणि ही संहिता पुरातत्त्व अभ्यासकांकडून तपासून घेतली. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे ,अमेरिकेतील कॅनॉयर, बडोदा येथील कुलदीप भाग, अजित प्रसाद तसेच के. कृष्णन यांनी गोवारिकरांना मार्गदर्शन केले.
 
वसंत शिंदे म्हणाले, अशितोष गोवारिकर यांनी चित्रपट दिग्दर्शनाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी स्वत: मोहेंजो दडोचा अभ्यास केला.त्यानंतर माझ्यासह इतर काही पुरातत्त्व अभ्यासकांशी संपर्क साधून आमच्याकडून मोहेंजो दडो विषयीची माहिती जाणून घेतली. मोहेंजो दडो येथे सापडलेले ठसे, विशिष्ट लिपी, ठशांवरील प्राणी, दगडावर कोरलेल्या मानवी आकृत्या तसेच नदी किनारी कशा पध्दतीने नगर वसले, या गोष्टींच्या आधारावर कल्पना करून सिनेमाचा सेट उभा करा,भरकटू नका, असा सल्ला गोवारिकरांना दिला होता. 
 
शिंदे म्हणाले, इराण, इराक, इजिप्तबरोबर मोहेंजो दडोचा संबंध आणि व्यापाराबाबतची माहिती दिली होती. येथील नागरिकांकडून सिल्कच्या कापडाचा वापर केला जात होता. त्याच प्रमाणे भगवान शंकराची पूजा कोणत्या पध्दतीने केली जात होती,अशा पुराव्याच्या आधारावरील गोष्टींचा विचार करून चित्रपट साकारावा,असेही त्यांना सांगितले होते. चित्रपटाच्या माध्यमातून पुरातन संस्कृतीची माहिती  सांगता येते,त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग झाले पाहिजेत.पुरातन संस्कृतीने देशासाठी काय योगदान दिले, तसेच या संस्कृतीतून आपण कोणते धडे घेतले पाहिजेत.हे सुध्दा समजते.                                               मोहेंजो दडो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो प्रदर्शित करण्यापूर्वी तुम्हाला दाखविला जाईल, असे गोवारिकर यांनी सांगितले होते.मात्र,आम्हाला तो दाखविण्यात आला नाही. त्यामुळे त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सांगता येणार नाही असे, प्रा.वसंत शिंदे, कुलगुरू ,डेक्कन कॉलेज यांनी सांगितले.

Web Title: This kind of moralejo dado

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.