राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे, साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा असहिष्णुतेविरोधात एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 20:14 IST2018-02-16T20:13:45+5:302018-02-16T20:14:16+5:30
बडोदा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजरातच्या भूमीवरच असहिष्णुतेविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एल्गार पुकारला आहे. ते म्हणाले, ‘‘देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्याच्या मागची त्यांची भूमिका शासनानं मोठ्या मनानं समजून घ्यायला हवी होती.

राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे, साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा असहिष्णुतेविरोधात एल्गार
महाराजा सयाजी गायकवाड़ सहित्यानगरी, बड़ोदा - बडोदा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजरातच्या भूमीवरच असहिष्णुतेविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एल्गार पुकारला आहे. ते म्हणाले, ‘‘देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्याच्या मागची त्यांची भूमिका शासनानं मोठ्या मनानं समजून घ्यायला हवी होती. आधुनिक- सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवं‘ भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही ही खेदाची बाब आहे. तुम्ही या अर्थान लोकशाहीचे तत्व पाळत नाही आहात. म्हणून मी असं म्हणण्याचं धाडस करतो की राजा तू चुकत आहे! तू सुधारलं पाहिजे.’’
आजचे सरकार ज्या सावरकरांना मानते, त्यांची विज्ञाननिष्ठा त्याने स्वीकारलेली नाही. सावरकरांनी ‘गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे,’ असे म्हटले होते. आज तिला पूज्य मानत गोहत्येच्या नुसत्या संशयावरूनही माणसांना मारले जातेय आणि गोपालन हा अतार्किक श्रद्धेचा विषय बनवत माणसांना हिंसक बनविले जात आहे, अशी टीका देखमुख यांनी आपल्या लिखित भाषणात केली आहे.
देशमुख यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पुरस्कार वापसी, दाभोलकर-पानसरे हत्येतील तपासात झालेली दिरंगाई आदी विषयांना स्पर्श केला आहे. भारतीय जनता पक्षाचा थेट उल्लेख केला नसला, तरी सध्याच्या सरकारच्या भूमिकेवर देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे, की राष्टÑवादाच्या नावाखाली काहींना आरोपींच्या पिंजºयात उभे केले जात आहे. काहींच्या राष्टÑभक्तीवर शंका घेतली जात आहे. गांधीजींच्या वचनांचा आधार देत ते म्हणतात, ‘देशभक्ती व राष्टÑवाद आणि माणसुकी-मानवता अलग नाहीत. म्हणून राष्टÑवादी हा सर्वसमावेशक असतो. तो कुणा गट, पक्ष, वंशाला वगळत नाही. आज याविरुद्ध घडताना दिसत आहे. म्हणून माझी चिंता मी या मंचावरून व्यक्त करीत आहे. समझनेवालों को इशारा काफी है।’
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या पुढे जाऊन सांस्कृतिक स्वातंत्र्यही कायद्याच्या मर्यादेत विनादडपण उपभोगता आले पाहिजे, अशी मागणी करताना देशमुख म्हणतात, सांस्कृतिक स्वातंत्र्यात मी काय खावं, कोणता पेहराव करावा, हे जसं येत तसंच माझं लैंगिक स्वातंत्र्य येतं. ते वेगळं आहे म्हणून कुणाला गुन्हेगार ठरवलं जाऊ नये. सांस्कृतिक स्वातंत्र्यावर कोणी घाव घालत असेल, त्याला तडे जात असतील तर प्रत्येकानं व विशेषत्वाने लेखक- कलावंतानं आवाज उठविला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याचा कोणत्याही प्रकारे संकोच होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे सरकार ती वेळ कुणावर येणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे., अशी मी आज अपेक्षा व्यक्त करतो. आशा आहे की माझं हे अरण्यरूदन ठरणार नाही.
चित्रपटाच्या कलावंतांना धमकी देणाºयांवर काही कार्यवाही सरकार करत नाही की न्यायालयास ही बाब सुमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घ्यावीशी वाटत नाही याबाबत खंत व्यक्त करताना देशमुख यांनी हे सारे प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आहेत, अशी टीका केली आहे. त्यामुळे कला-साहित्य जगत अस्वस्थ आहे, भयग्रस्त आहे असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कार वापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्याच्या मागची त्यांची भूमिका शासनानं मोठ्या मनानं समजून घ्यायला हवी होती अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली आहे. आधुनिक- सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवं‘ भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वॉल्टेअरच्या विधानाच संदर्भ त्यांनी दिला आहे. ‘मी कदाचित तू जे म्हणतोस त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही. पण तुझ्या त्या म्हणण्याच्या अधिकाराचं मी मृत्यू आला तरी रक्षण करीन’ ही बाब मला सरकारला सागायची आहे. तुम्ही या अर्थान लोकशाहीचे तत्व पाळत नाही आहात. म्हणून मी असं म्हणण्याचं धाडस करतो की राजा तू चुकत आहे! तू सुधारलं पाहिजे.
अमर्त्य सेनवरील लघुपट असो किंवा २०१७ च्या भारताच्या आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात ज्युरीनं निवडलेले ‘न्यूड’, ‘एस. दुर्गा’ चित्रपट सरकारकडून वगळळे असो, या घटना सरकारचा केवळ अनुदान दृष्टीकोन व्यक्त करीत नाहीत तर त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य नियंत्रित करण्याची, नाकारण्याची किंवा गळचेपी करण्याची वृत्त पण स्पष्ट होते, हे अधिक धोक्याचे आहे, असा स्पष्ट आरोप देशमुख यांनी केला आहे. पद्मावत चित्रपटाच्या निमित्ताने झुंडींना राज्य शासन हतबल किंवा छुपी साथ देत आहे, असे चिंताजनक चित्र समाार आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी व कर्तव्य आहे, ते राज्य शासनच कायदा मोडणार असतील तर लोकशाही कशी सुरक्षित राहिल? असा सवालही त्यांनी केला आहे.