किंगमेकर ठरू-राष्ट्रवादी
By admin | Published: October 17, 2014 02:09 AM2014-10-17T02:09:46+5:302014-10-17T02:09:46+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला चार प्रमुख पक्षांमध्ये सर्वात कमी जागा मिळतील आणि गेल्या वेळपेक्षा निम्म्याही जागा मिळणार नाहीत, असे भाकित वर्तविले जात आहे.
Next
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला चार प्रमुख पक्षांमध्ये सर्वात कमी जागा मिळतील आणि गेल्या वेळपेक्षा निम्म्याही जागा मिळणार नाहीत, असे भाकित वर्तविले जात आहे. मात्र, असे असताना कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते.
2क्क्9च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 62 जागा मिळाल्या होत्या. यावेळी बहुतेक एक्ङिाट पोलमध्ये या पक्षाला 28 ते जास्तीत जास्त 5क् जागांपलिकडे कोणी द्यायला तयार नाही. 1999पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर पक्षाची यावेळची कामगिरी सर्वात खराब अशी असेल. असे असले तरी त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत राष्ट्रवादीला महत्त्व येऊ शकते.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असे एकत्र येऊन 145 चा जादुई आकडा गाठला जात असेल तर तसा प्रयत्न केला जाऊ शकतो. काँग्रेस आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा विचार या निमित्ताने होईल. या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीकडूनही झाला होता.
राष्ट्रवादीची साथ घेऊन मुख्यमंत्रीपद मिळते का याची चाचपणी शिवसेना करू शकते. ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच’ असे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले होते. त्या आव्हानाच्या पूर्तीसाठी राष्ट्रवादीची साथ घेतली जाऊ शकते, असे सूत्रंनी सांगितले.
भाजपाला बहुमतासाठी जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाईल का, या बाबतही उलटसुलट चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राष्ट्रवादीची मदत घेणार नाही, असे भाजपाने गुरुवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, सरकारच्या स्थापनेत राष्ट्रवादीची अत्यंत निर्णायक अशी भूमिका राहील. मात्र, त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत राष्ट्रवादी कोणाबरोबर जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची मदत घेऊ नका असा मोठा दबाव भाजपांतर्गत आहे. ‘भ्रष्टवादी पक्ष’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढविला होता. अशावेळी आता सत्तेसाठी या पक्षाची मदत घेतली तर भाजपाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल, असा विचारप्रवाह भाजपात आहे.
विरोधात बसण्याची भूमिका
त्रिशंकू विधानसभेची स्थिती आली तर सत्तेसाठी कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा प्रकार काँग्रेस करणार नाही. त्यापेक्षा आम्ही विरोधात बसणो पसंत करू, असे या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. सत्तेसाठीचा घोडेबाजार, जोडतोडीचे राजकारण यापासून काँग्रेस स्वत:ला दूरच ठेवण्याची शक्यता दाट आहे.