‘चतुरंग’चे किरण जोगळेकर यांचे निधन

By admin | Published: October 19, 2016 04:24 AM2016-10-19T04:24:46+5:302016-10-19T04:24:46+5:30

चतुरंग प्रतिष्ठानच्या डोंबिवली शाखेचे प्रमुख आधारस्तंभ किरण जोगळेकर यांचे मंगळवारी सकाळी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Kiran Joglekar dies of 'Chaturanga' | ‘चतुरंग’चे किरण जोगळेकर यांचे निधन

‘चतुरंग’चे किरण जोगळेकर यांचे निधन

Next


डोंबिवली : चतुरंग प्रतिष्ठानच्या डोंबिवली शाखेचे प्रमुख आधारस्तंभ किरण जोगळेकर यांचे मंगळवारी सकाळी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. जोगळेकर हे बॅक आॅफ इंडियामध्ये ३५ वर्षापासून नोकरी करीत होते. सध्या ते सीबीडी बेलापूर शाखेत कार्यरत होते. डोंबिवलीत ३० वर्षापूर्वी चतुरंगची स्थापना झाली तेव्हापासून त्यांनी चतुरंगची धुरा सांभाळली होती. उत्तम संघटक म्हणून त्यांची ख्याती होती. डोंबिवलीच्या चतुरंगचे प्रमुख आधारस्तंभ होते. चतुरंगला २५ वर्षे झाली तेव्हा त्यांनी भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. ते मितभाषी, शांत स्वभावाचे होते. जोगळेकर यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, आई वडिल, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kiran Joglekar dies of 'Chaturanga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.