...म्हणून ते हे सगळं करतायेत; मनसेनंतर आता शिवसेनेनेही अभिनेता किरण मानेंना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:22 PM2022-01-16T23:22:06+5:302022-01-16T23:22:27+5:30
राजकीय भूमिका मांडल्याने कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
मुंबई – अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर राजकीय पोस्ट टाकत असल्याने स्टार प्रवाह मालिकेतून काढल्याचा दावा केला आहे. यावरुन महाराष्ट्रात किरण मानेंच्या समर्थनार्थ I Stand With Kiran Mane ही कॅम्पेन सोशल मीडियावर सुरु करण्यात आली. किरण माने प्रकरणात राजकीय नेतेमंडळीनीही उडी घेतली. काँग्रेसचे सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हा तर भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणून आरोप करत किरण माने प्रकरणी भाजपावर टीकास्त्र सोडलं.
या प्रकरणान मनसेचे अमेय खोपकर यांनी भूमिका मांडल्यानंतर आता शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनीही किरण मानेंना फटकारलं आहे. आदेश बांदेकर म्हणाले की, किरण माने यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते असा वाद निर्माण करत आहेत. हा सगळा वेडेपणा आहे. मागच्या अनेक वर्षापासून मी इंडस्ट्रीत काम करतोय. पण मला इतक्या दिवसात असा कुठलाही अनुभव आला नाही. कुठलंही चॅनेल असं करत नाही. किरण मानेंच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचं असल्याने हे सगळं करतायेत असा टोला बांदेकर यांनी लगावला आहे.
योग्य वेळी भूमिका मांडणार – मनसे
किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. किरण यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल असं विधान मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले आहेत.
किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट
किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो तर, शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. भारतातील कला क्षेत्राचं त्यांना प्रचंड ज्ञान आहे, अभ्यास आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही, बाकीचे उथळपणाने प्रतिक्रिया देणारे नेते आहेत. मी त्यांचा प्रचंड आदर करतो, म्हणून ते जर म्हणाले की, एखादी गोष्ट विचार न करता कर, तर मी ती नाही करणार, मी अंधपणे होकार नाही देत. पण, माझी बाजू त्यांच्याकडे मांडावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, असे किरण माने यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
कुठला बाप आपल्या लेकीला अपशब्द उच्चारतो?; ‘साजिरी’नं विचारला किरण मानेंना सवाल
...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा