Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात भाजपा कार्यकर्ते आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 06:51 AM2022-04-24T06:51:13+5:302022-04-24T06:51:41+5:30

पोलिसांच्या सहाय्याने राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणार असेल तर भाजपा आणि सामान्य माणूस शांत बसणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Kirit Somaiya: BJP workers will hold agitation in Maharashtra to protest Kirit Somaiya attack says Chandrakant Patil | Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात भाजपा कार्यकर्ते आंदोलन करणार

Kirit Somaiya: किरीट सोमय्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात भाजपा कार्यकर्ते आंदोलन करणार

Next

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमय्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांनी सुचेल तसं या गोष्टीसाठी आंदोलन करावं. आता ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला. पोलीस स्टेशनच्या आवारात हा हल्ला झाला. पश्चिम बंगाल, केरळसारखी अवस्था महाराष्ट्राची झालीय का? राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू दिले नाही. राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. दिवसभर त्यांच्या घराबाहेर तमाशा आणि हैदोस घालणाऱ्यांना पोलीस अटक करणार नाही का? पोलीस तमाशा बघणार का? कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करणारेही पकडले नाहीत.  पोलिसांच्या सहाय्याने राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणार असेल तर भाजपा आणि सामान्य माणूस शांत बसणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी लढाईसाठी सज्ज राहायला पाहिजे. आमच्या नेत्यांवरील हल्ला बसून पाहणार नाही. ही लढाई महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजपा आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणून विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु ते झाले नाही. स्वत:ला पराभूत व्हावं लागलं. पोलखोलला इतकं का घाबरता? महाराष्ट्रात या हल्ल्याचा निषेध नोंदवावा. आरोपी अटकेपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री, गृह सचिवांना पत्र लिहिणार

किरीट सोमय्या यांचावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी" होम सेक्रेटरी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिणार असून जबाबदारी न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) करणार आहे. फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत. किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे. तुम्ही रोड क्लिअर करा, मी बाहेर जातो असंही पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न करता शिवसैनिकांच्या गुंडांना हल्ला करण्याची परवानगी दिली असा आरोप फडणवीसांनी केला.

शिवसैनिकांनी हल्ला केला नाही - शिवसेना

शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर(Vishwanath Mahadeshwar) यांनी या किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे. तर शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला नाही असं ते म्हणाले. सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पोलीस उद्धव ठाकरेंच्या घरचे नोकर आहेत का? जोपर्यंत खार पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर घटनास्थळावरून हलणार नाही. जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे घटनास्थळी पोहचत नाहीत तोवर जागा सोडणार नाही. माझी हत्या करण्यासाठी हल्ला करण्यात आला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.  

Web Title: Kirit Somaiya: BJP workers will hold agitation in Maharashtra to protest Kirit Somaiya attack says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.