सोमय्या व्हिडीओ प्रकरण: राज्य महिला आयोगाने घेतली दखल; मुंबई पोलिसांना दिले 'हे' निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:32 PM2023-07-18T20:32:46+5:302023-07-18T20:33:22+5:30
सोमय्या व्हिडीओ प्रकरणात आता नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत
Kirit Somaiya Controversy: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. सोमवारी ही व्हिडीओ क्लिप एका वृत्तवाहिनीने दाखवली. त्यानंतर याचे पडसाद उमटू लागले. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून या व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू आहे. यामध्ये जवळपास ८ तासांच्या ३५ व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून पोलिसांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे.विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडिओ बाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे ट्विट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपा नेते श्री.किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे.विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडिओ बाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 18, 2023
तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास… pic.twitter.com/l6OF9aAFYS
दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीवर एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. तसेच, अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. मात्र माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असे अत्याचार झालेले नाहीत असे किरीट सोमय्या यांनी पत्रात लिहिले आहे. अशा सर्व आरोपांची, तसेच व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासून चौकशी करावी, अशी विनंतीही किरीट सोमय्या यांनी केली आहे.