"मेट्रोचे काम थांबण्यामागे बालहट्ट की राजहट्ट"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 11:16 AM2020-03-09T11:16:33+5:302020-03-09T11:21:29+5:30
भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध केला होता.
मुंबई : भाजप सरकारच्या काळात चर्चेत आलेला मेट्रो प्रकल्पाच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने तूर्तास ब्रेक लावला आहे. तर यावरूनच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मेट्रोचे काम थांबवण्यामागे बालहट्ट की राजहट्ट, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले असून, मेट्रो कारशेडचे काम 1 मिलिमीटर सुद्धा पुढे सरकले नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 1000 कोटींची वाढ झाली आहे. न्यायालय आणि इतर सर्वच स्तरावरुन परवानगी मिळूनही विलंबाचे कारण काय ? असा सवाला त्यांनी उपस्थित केला. तर मेट्रोचे काम थांबण्यामागे बालहट्ट की राजहट्ट आहे?" असा खोचक टोलाही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
*ठाकरे सरकारचे १०० दिवस पूर्ण, पण मेट्रो कारशेडचे काम १ मिलिमीटर ही पुढे सरकले नाही*
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 8, 2020
*प्रकल्पाच्या खर्चात तब्बल १००० कोटींची वाढ,*
*कोर्टाकडून आणि सर्वच स्तरावरुन परवानगी मिळूनही विलंबाचे कारण ?
राज हट्ट !? बाल हट्ट ! ???? @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil
भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या प्रकरणी त्यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीनं कारशेडसाठी कांजूरमार्गचा विचार केला. मात्र खर्चात कोट्यवधींची वाढ होणार असल्यानं हा पर्याय मागे पडला. त्यामुळे पुढे या कामाला गती मिळाली नाही.