खासदार निधी वापरण्यात राज्यात किरीट सोमय्या प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:50 AM2019-04-11T06:50:00+5:302019-04-11T06:50:02+5:30
लोकांची किती कामे केली व किती विकास केला याचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नाही असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते़.
- विवेक भुसे
पुणे : संसदेतील खासदारांना त्यांच्या स्थानिक मतदारसंघाच्या विकासासाठी दरवर्षी ५ कोटी रुपयांचा निधी मिळतो़. अन्य राज्यातील खासदार या निधीचा पूरेपूर वापर करुन आपले स्थान बळकट करताना दिसत असताना राज्यातील खासदार मात्र हा निधी पूर्णपणे खर्च करण्यात उदासिन असल्याचे दिसून आले़. खासदार निधीचा वापर करण्यात महाराष्ट्राचा देशभरात २९ क्रमांक लागतो़ जर राज्यातील खासदारांनी आपला मिळालेला खासदार निधीचा पूरेपूर उपयोग केला असता तर किमान १ हजार २०० कोटी रुपयांची कामे झाली असती़. पण, खासदारांनी निधीचा वापर न केल्याने किमान ४१५ कोटी ६८ लाख रुपयांचा राज्याचा तोटा झाला आहे़. राज्यात खासदार निधीचा सर्वाधिक वापर करण्यात किरीट सोमय्या यांचा पहिला क्रमांक लागला असून त्यांनी २५ कोटी ६१ लाख रुपयांचा वापर केला आहे़.
लोकांची किती कामे केली व किती विकास केला याचा आणि निवडून येण्याचा काही संबंध नाही असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते़. त्याचा प्रत्यय यंदा तिकीट वाटपावर पाहिल्यावर दिसून येत आहे़. किरीट सोमय्या यांनी राज्यात सर्वाधिक निधी खर्च केला असला तरी राजकीय सोयीसाठी व शिवसेनेचा विरोध लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही़. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार निधी वापरण्यात शेवटून दुसरे आहेत़. पण त्यांच्या उमेदवारीला असलेला विरोध दूर करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली़. देशातील खासदारांचा विकास निधी वापर करण्याची राष्ट्रीय सरासरी १८ कोटी २ लाख रुपये आहे़. त्यापेक्षा महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी कमी खासदार निधीचा वापर केला आहे़.
खासदार निधी खर्च करण्यात देशात छत्तीसगडचा तिसरा क्रमांक लागतो़. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने तेथील सर्व खासदारांची तिकीट कापण्यात आली आहे़. छत्तीसगडच्या खासदारांनी विकास निधीचा वापर करुन केलेल्या कामाची तुलना केली तर महाराष्ट्रातील बहुसंख्या खासदारांना यंदा तिकीट मिळू शकले नसते़.
महाराष्ट्रातील खासदारांपेक्षा बिहार, उत्तर प्रदेशासह छोट्या छोट्या राज्यातील खासदार विकास निधी खर्च करण्यात किती तरी पुढे आहेत़.
सर्वाधिक खासदार निधीचा वापर करणारे खासदार (कोटी रुपये)
किरीट सोमय्या २५़६१
रामदास तडस २३़५७
राहुल शेवाळे २०़८८
पूनम महाजन २०़६२
डॉ़ श्रीकांत शिंदे २०़३९
हिना गावीत २०़२३
़़़़़़़़़़़़़़़़
सर्वात कमी खासदार निधीचा वापर करणारे खासदार (कोटी रुपये)
डॉ़ प्रीतम मुंडे ७़३२
रावसाहेब दानवे १०़६७
भावना गवळी १०़५५
रक्षा खडसे १०़८९
सुभाष भामरे १२़५३
़़़़़़़़़
देशातील सर्वाधिक खासदार निधी वापरणारे खासदार (कोटी रुपये)
जनार्दन सिंग सीग्रीवाल ३१़ ४५
लक्ष्मण गिलुवा २७़४८
टी़ जी़ वेंकटेश बसू २६़८०
चेंडी पासवान २६़६१
संध्या रॉय २६़६०
उदीत राज २६़४१
़़़़़़़़़़़
सर्वाधिक खासदार निधीचा वापर करणारी राज्ये (सरासरी, कोटी रुपये)
चंदीगड २५़४२
हिमाचल प्रदेश २२़८१
छत्तीसगड २२़४०
मणिपूर २२़१६
गुजरात २१़४५
महाराष्ट्र १५़५९ (२९ वा क्रमांक)
़़़़़़़
सर्वाधिक खासदार निधीचा वापर करणो पक्ष (सरासरी, कोटी रुपये)
पट्टाली मक्कल काटची २३़६२
आम आदमी पक्ष २२़१९
जनता दला युनायटेड २२़०१
लोकजन शक्ती २१़२७
अण्णा द्रमुक २०़७५
़़़़़़