Shiv Sainiks attack Kirit Somaiya Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 10:52 PM2022-04-23T22:52:27+5:302022-04-23T23:04:17+5:30
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या.
खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला. सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांच्या तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या हनुवटीवरून रक्त येत होते.
राणा दाम्पत्याला सांगितल्या प्रमाणे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी खारच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. यावर राणांच्या आजच्या या कारस्थानाला भाजपाचा पाठिंबा होता हे सिद्ध झाल्याचा आरोप माजी महापौर महाडेश्वर यांनी केला आहे. दरम्यान किरीट सोमय्या पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी किरीट सोमय्या मधल्या सीटवर बसले होते, तेव्हा त्यांच्या काचेवर दगड भिरकावण्यात आला. यामुळे सोमय्या यांच्या तोंडाला दुखापत झाली आहे. किरीट सोमय्या जखमी अवस्थेत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत.
किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी दगड फेकला; कारची काच फुटली. https://t.co/CbvSFUBywh#kirit_somaiya#KiritSomaiya#shivsena#ShivsenaVsRana#BJPpic.twitter.com/WzayGfokwF
— Lokmat (@lokmat) April 23, 2022
सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. सोमय्या यांच्या चालकाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
तिथे उपस्थित असलेले माजी महापौर महाडेश्वर यांनी आता खरे काय सुरु होते हे समोर आले आहे. भाजपाचा राणांच्या या कारस्थानामागे हात होता. त्यांचा नेता इथे आल्याने ते आता जनतेसमोर आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रवी राणांनी जामिन घेण्यास नकार दिला. आपल्याला बेकायदेशीर अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी, रवी राणा यांनी खार पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली आहे. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी रवी राणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर शिवसेनेच्या चार जिल्हाप्रमुखांनी राणा दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान राणा यांच्या वक्तव्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. राणा यांनी लोकांना मुंबईत बोलविण्याचा व्हिडीओ शोधत आहेत.