किरीट सोमय्या प्रकरणात ट्विस्ट! ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचा पोलिसांचा दावा; परंतु....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:38 PM2023-07-26T15:38:13+5:302023-07-26T15:38:46+5:30

Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

kirit somaiya viral video case new update from police investigation | किरीट सोमय्या प्रकरणात ट्विस्ट! ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचा पोलिसांचा दावा; परंतु....

किरीट सोमय्या प्रकरणात ट्विस्ट! ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचा पोलिसांचा दावा; परंतु....

googlenewsNext

Kirit Somaiya Viral Video: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. ठाकरे गटातील आमदारांनी या व्हिडिओवरून किरीट सोमय्या यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. आता हा व्हिडिओ खरा असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडिओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडिओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत. यासंबधी एका वृत्तवाहिनीने वृत्त दिल्याचे सांगितले जात आहे. 

व्हायरल झालेला व्हिडिओ किरीट सोमय्यांचाच!

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. व्हायरल झालेला तो आक्षेपार्ह व्हिडिओ किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. परंतु हा आक्षेपार्ह व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहेत. किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. हा व्हिडिओ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी एक पेन ड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला होता. 

 

Web Title: kirit somaiya viral video case new update from police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.