'त्या' व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:29 AM2023-07-18T09:29:07+5:302023-07-18T09:29:40+5:30

सोमवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीने सोमय्यांचे व्हिडिओ दाखवले होते. त्यात सोमय्या यांचे अश्लिल चाळे पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता

Kirit Somaiya wrote a letter to Devendra Fadnavis on the alleged viral video | 'त्या' व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं

'त्या' व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं

googlenewsNext

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आता या प्रकरणी किरीट सोमय्यांनी मौन सोडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोमय्यांनी व्हिडिओ प्रकरणावर भाष्य केले आहे.

किरीट सोमय्यांनी पत्रात म्हटलंय की, एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शिक करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारे अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत असेही सांगण्यात आले आहे. येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही हे मी स्पष्ट करतो असं त्यांनी लिहिलं.

त्याचसोबत या सर्व आरोपांची चौकशी करावी अशी मागणी करत ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य व्हिडिओ क्लिप जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याचीही चौकशीही करावी अशी मी आपणास विनंती करतो अशा शब्दात भाजपा नेते किरिट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

सोमवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीने सोमय्यांचे व्हिडिओ दाखवले होते. त्यात सोमय्या यांचे अश्लिल चाळे पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माझ्याकडेही अशा अनेक क्लिप्स आहेत, अनेक तक्रारी आहेत आता बोललो तर त्या महिलांची ओळख दाखवावी लागेल असा आरोप केला होता. तर दुसऱ्यांवर चिखल उडवणारे सोमय्या स्वत: चिखलात लोळतायेत. महिलांसोबत असे अश्लिल प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. भाजपाने सोमय्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांनी केली.

Web Title: Kirit Somaiya wrote a letter to Devendra Fadnavis on the alleged viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.