किरीट सोमय्यांच्या पैसे वाटपाच्या वृत्ताने खळबळ
By admin | Published: February 17, 2017 01:14 AM2017-02-17T01:14:35+5:302017-02-17T06:10:57+5:30
काळापैसा आणि भ्रष्टाचार मोडिस काढण्यासाठी खुदद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला असतानाच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणारे भाजप नेते किरीट
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला असतानाच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या मतदारांना पैसे वाटत असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली.
मुलूंडच्या राहुल नगर परिसरात गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले.
मुलगा नील लढत असलेल्या मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 108 मध्ये खासदार किरीट सोमय्या पैसे वाटप करणार असल्याची कुणकुण तेथील विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना लागली. त्यांनी नील सोमय्याच्या गाडीवर वॉच ठेवला. दरम्यान ते पैसे वाटप करत असल्याचा दावा करत हे प्रकरण मुलुंड पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. पोलिसांसह निवडणूक अधिका-यांचे पथक राहुल नगर येथे दाखल झाले. त्यांनी त्याच्या गाडीची व्हिडीओ शूटिंग करुन तपासणी केली. मात्र, यात काहीही आढळून आले नसल्याची माहीती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली आहे. मात्र, येत्या काही दिवसात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.