'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 01:19 PM2023-03-11T13:19:12+5:302023-03-11T13:20:01+5:30

उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले.

Kirit Somayya targets NCP Hasan Mushrif along with Uddhav Thackeray | 'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा

googlenewsNext

मुंबई - हसन मुश्रीफांनी कोट्यवधीची लूट केलीय, भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच. ४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केलीत. शेतकऱ्यांकडून १० हजार घेतलेत. ते शेतकरी कुठे आहेत? हसन मुश्रीफ कुटुंबाने मनी लॉन्ड्रिंग केली आहे. सेटलमेंटचे अर्ज का केले? आयकर खात्याच्या ऑर्डरविरोधात हायकोर्टात कोण गेले? चोरी केली ती पकडली गेली त्यामुळे आता सेटलमेंटची भाषा करावी लागली असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. 

किरीट सोमय्या म्हणाले की, राज्यातील जनतेला लुटले, पैसे परत केले. १ डझन नेत्यांवर आताही चौकशी, कारवाई सुरू आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावर कारवाई सुरू आहे. अनिल परबांवर १२ खटले आहेत. उद्धव ठाकरेंचे भागीदार रवींद्र वायकर यांनी लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर ५०० कोटी रुपयांचे हॉटेल बांधले. या लुटारूंना हिशोब द्यावा लागेल असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही. ९१ वर्षाच्या आईवर आरोप केले. पत्नी-मुलांवर आरोप केले. आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. विरोधी पक्ष एकत्र येतात, पत्रक काढतात. जर मी गुन्हा केला, दादागिरी केली तर मला अटक का केली नाही? माझ्यावर इतके गुन्हे दाखल केले पण सिद्ध झाले नाही. धमक्या देणे बंद करा. लुटीचा पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करा असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कोट्यवधीचे बोगस कर्ज घेतले ते परत करा. चोरी केली ही कबूल करा. शिक्षेला सामोरे जा. हसन मुश्रीफांवर अडीच वर्षाच्या काळापासून कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी कारवाई दाबण्याचा प्रयत्न केला. आता हे घोटाळे बाहेर आले. भाजपा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते मग कारवाई का केली नाही. आजही पुरावे असतील तर कोर्टात जा, संबंधित यंत्रणांना भेटा असं आव्हान किरीट सोमय्यांनी विरोधकांना केले आहे. 

'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान
 प्रत्येकाची पीडा समजून घेतली पाहिजे. ठाकरे म्हणतात, तोतऱ्या, ज्यांची संस्कृती तशी भाषा, या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे १९ बंगले पाडले, गायब केले त्याबाबत हिशोब द्या ना. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. ज्या शिव्या द्यायच्या त्या द्या. १९ बंगले कुठे गायब केले त्याचे उत्तर द्या असं आव्हान किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. 
 

Web Title: Kirit Somayya targets NCP Hasan Mushrif along with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.