किर्लोस्कर कुटुंबियातील वाद न्यायालयात
By admin | Published: April 27, 2017 02:00 AM2017-04-27T02:00:52+5:302017-04-27T02:00:52+5:30
प्रतिष्ठित किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता शिगेला पोहचला असून प्रसिध्द ‘लकाकी’ बंगल्याबाबत वरिष्ठस्तर दिवाणी
पुणे : प्रतिष्ठित किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता शिगेला पोहचला असून प्रसिध्द ‘लकाकी’ बंगल्याबाबत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाला आहे. भिंती पडायला आल्याने त्याबाबत दुरुस्तीसाठी परवानगी मागणाऱ्या अर्जावर न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला. बुधवारी सुमनताई किर्लोस्कर यांच्यावतीने बुधवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
पुण्याच्या मॉडल कॉलनीत तळ्याजवळ ‘लकाकी’ बंगला आहे. शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात जानेवारीपासून यासंदर्भात दावा सुरु आहे. १० कोटी रुपयांचा भूखंड हडपल्याच्या आरोपावरून सुमनताई किर्लोस्कर यांनी त्यांचे चिरंजीव, उद्योगपती संजय किर्लोस्कर यांच्यावर दावा केला आहे. त्या ज्या बंगल्यात राहतात त्या लकाकी बंगल्याशी संबंधित भूखंडाशी निगडीत हा वाद आहे. सुमनताई किर्लोस्कर ८२ वर्षाच्या असून त्यांनी ५९ वर्षीय संजय यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. १९५७ मध्ये शंतनूराव किर्लोस्कर कुटुंबियांनी हा बंगला खरेदी केला होता. त्यानंतर या मालमत्तेचे विभाजन होत गेले. (प्रतिनिधी)