कीर्तनकार झाले लोभी -साखरे महाराज

By admin | Published: July 16, 2015 04:00 AM2015-07-16T04:00:16+5:302015-07-16T04:00:16+5:30

ईश्वरनिष्ठा असलेली मांदियाळी कमी झाली असून केवळ गर्दी खेचणारे कीर्तनकार आज तयार झाले आहेत़ अशाच कीर्तनकारांना जास्त मागणी असल्याने कीर्तनकार द्रव्यलोभी झाले आहेत

Kirtankar became greedy - Sakhare Maharaj | कीर्तनकार झाले लोभी -साखरे महाराज

कीर्तनकार झाले लोभी -साखरे महाराज

Next

- बाळासाहेब बोचरे,  वाल्हे
ईश्वरनिष्ठा असलेली मांदियाळी कमी झाली असून केवळ गर्दी खेचणारे कीर्तनकार आज तयार झाले आहेत़ अशाच कीर्तनकारांना जास्त मागणी असल्याने कीर्तनकार द्रव्यलोभी झाले आहेत, अशी खंत ह़भ़प़ किसन महाराज साखरे यांनी व्यक्त केली़
वयाची पंचाहत्तरी ओलांडली, अपघातात जखमी असले तरी साखरे महाराजांची वारी चालू आहे़ १०१ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत़ वाणी आणि लेखणी चालू आहे तोपर्यंत कीर्तन आणि लेखन चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले़आमचे कीर्तनकार हे उपदेशाऐवजी विनोदाकडे आणि विडंबनाकडे वळले आहेत़ लय, विनय आणि अभिनय या तीन गोष्टींचा या अभाव असल्याचे दिसते आहे, असे सांगून श्रोता आणि कीर्तनकार वाढले पाहिजेत. असे ते म्हणाले.

शाळेला बुट्टी, वारीशी गट्टी : इथे संस्कारांचे अनेक पैलू शिकायला मिळतात म्हणून मी आणि माझ्या दोन लहान मुली मिळून पायी वारीला आलो आहोत, असे वेवूर पालघर येथील मनीषा मनीष मोरे यांनी सांगितले़ त्यांच्या कन्या संस्कृती (१३) आणि भक्ती (१०) या शाळेला बुट्टी मारून वारीमय झाल्या आहेत.

Web Title: Kirtankar became greedy - Sakhare Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.