Kisan Long March : शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 17:44 IST2018-03-12T16:08:06+5:302018-03-12T17:44:41+5:30
किसान सभा मोर्चाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ यांच्यातील बैठक अखेर संपली आहे.

Kisan Long March : शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली
मुंबई : किसान सभा मोर्चाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक तब्बल तीन तास चालली. विधानभवनातील सचिवालयामध्ये ही बैठक पार पडली. बैठकीत शेतक-यांच्या जवळपास 80 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मोर्चेक-यांच्या 12-13 मागण्या होत्या. त्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आजच्या बैठकीतील चर्चेनंतर आंदोलकांचे शिष्टमंडळ समाधान झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे. पी. गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अजित पवार, राधाकष्ण विखे पाटील आदींचे 12 जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या समितीतील सहा मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.
मान्य करण्यात आलेल्या मागण्या-
- जुनं रेशन कार्ड सहा महिन्यात बदलून देणार
-आदिवासी भागातील रेशन कार्डाची तीन महिन्यात होणार दुरुस्ती
- अन्य भागात सहा महिन्यात रेशन कार्ड बदलून मिळणार
- वन जमिनीबाबत येत्या सहा महिन्यात घेणार निर्णय
- वन हक्क कायद्याचे दावे सहा महिन्यात संपवणार
- अपात्र प्रकरणे पुन्हा तपासणार
-2006 पूर्वी जेवढी जागा होती ती परत देणार