किसान मुक्ती यात्रा आज महाराष्ट्रात
By Admin | Published: July 8, 2017 03:31 AM2017-07-08T03:31:11+5:302017-07-08T03:31:11+5:30
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करावे व स्वामिनाथन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मंदसौर (मध्य प्रदेश) येथून निघालेली किसान मुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करावे व स्वामिनाथन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मंदसौर (मध्य प्रदेश) येथून निघालेली किसान मुक्ती यात्रा शनिवारी सायंकाळी आठ वाजता मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणार आहे.
रविवारी लोणखेडा (ता. शहादा) येथे सकाळी नऊ वाजता जाहीर सभा होणार आहे. ही यात्रा शनिवारी दुपारी चार वाजता मध्य प्रदेशातील निसरपूर येथे येणार असून रात्री आठ वाजता महाराष्ट्रात प्रवेश करून लोणखेडा (ता. शहादा) येथील पाटीदार मंगल कार्यालयात मुक्कामी राहणार आहे. त्याचठिकाणी रविवारी सकाळी नऊ वाजता सभा होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी दिली. लोणखेडा येथील सभेनंतर यात्रा शहादा शहरात येणार असून त्यानंतर दोंडाईचामार्गे धुळे येथे प्रस्थान करणार आहे. धुळ्यात दुपारी जाहीर सभा होणार आहे.