शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच पाठविला किसान रेल्वेने शेतमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 08:16 AM2020-09-22T08:16:48+5:302020-09-22T08:17:22+5:30

रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही.

kisan rail sent agricultural commodities by traders instead of farmers | शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच पाठविला किसान रेल्वेने शेतमाल

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच पाठविला किसान रेल्वेने शेतमाल

Next

योगेश बिडवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने एसी वाहतुकीसाठी ७ आॅगस्टपासून ‘किसान रेल’ ही विशेष सेवा महाराष्ट्रातून आठवड्यात तीन वेळा सुरू झाली असून त्यात शेतकºयांचा मात्र थेट सहभाग नसल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. व्यापारीच फळे-भाजीपाला पाठवीत आहेत.
रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही. कोणतेही मार्गदर्शन नसल्याने कांदे पाठविता येत नसल्याचे चांदवडचे (नाशिक) शेतकरी सुनील क्षीरसागर, प्रकाश सोनवणे, सुखदेव खैरनार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आम्ही सिन्नर येथून शेतकºयांकडून भाजीपाला घेतो. तो किसान रेल्वेने बिहार, उत्तर प्रदेशात पाठवितो.
- सचिन पाटील, संचालक, व्हेजिटेबल कं पनी, नाशिक
रेल्वेने आमच्याशी संपर्क साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित ड्राय पोर्ट कार्यरत झाल्यास त्याचा शेतकºयांना मोठा फायदा होईल.
- विलास शिंदे,
सह्याद्री फार्म्स, नाशिक

शेतकºयांच्या नावावर व्यापारीच फायदे घेत असतात. शेतकºयांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या प्रवासी रेल्वे बंद असल्याने किसान रेल्वे वेळेत उत्तर भारतात पोहोचते. सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मालवाहतुकीला दुय्यम महत्त्व देऊ नये.
- नानासाहेब पाटील,
संचालक, नाफेड

Web Title: kisan rail sent agricultural commodities by traders instead of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.