किसान सन्मान निधी बँक खात्यात जमा केला अन् परतही घेतला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:59 AM2019-02-26T05:59:34+5:302019-02-26T05:59:54+5:30
नाशिकमधील प्रकार; बँक अधिकाऱ्यांनी केले हात वर
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात प्रारंभ झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक जमा झाले अन् काही तासांतच ही रक्कम परत काढून घेण्यात आली.
सिन्नर येथील अशोक लहागमे यांना रविवारी दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला. मात्र त्यांच्या खात्यातून ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा दुसरा एसएमएस त्यांना आला. रविवारची सुट्टी असल्याने त्यांना बॅँकेत जाऊन त्याची माहिती घेता आली नाही. सोमवारी त्यांनी स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी विचारले असता, त्यांनी मुंबई कार्यालयाला ईमेल करा असे सांगत हात वर केले.
रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास माझ्या खात्यात पैसे जमा झाले, पण साडेचारच्या सुमारास पुन्हा पैसे काढल्याचा एसएमएस आला. बँकेत विचारणा केली असता, आम्हालादेखील काही माहिती नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.
- अशोक लहामगे, शेतकरी