Maharashtra Politics: “निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:24 PM2022-11-23T18:24:18+5:302022-11-23T18:25:00+5:30

Maharashtra News: महापालिका आपल्याकडेच राहणार आहे, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत केल्याचे सांगितले जात आहे.

kishori pednekar told that shiv sena uddhav thackeray gave instructions about to get ready for next mumbai municipal election | Maharashtra Politics: “निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Maharashtra Politics: “निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

googlenewsNext

Maharashtra Politics: देशभरात विविध ठिकाणी निवडणुका सुरू आहे. हिमाचल प्रदेश, गुजरातमध्ये विधानसभा तर उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यातच महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाण्याची निवडणूक शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी मोठे आव्हान मानले जात आहे. यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आदेश देत, निवडणुकीच्या तयारीला लागा, निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात उतरा, अशा सूचना केल्या आहेत. 

शिवसेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत. यावेळी आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभेचे पराभूत उमदेवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या तयारीच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात बैठक घेतली. निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सिनेटपासून ते इतर सर्व निवडणुकीत कसे काम करायचे, याचे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केले, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

महापालिका आपल्याकडेच राहणार आहे

उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य उपस्थित नेत्यांनीही मार्गदर्शन केले. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले. महापालिका आपल्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा. गाफील राहू नका, असा सल्ला देत, वॉर्ड पुनर्ररचनेची चिंता करू नका. ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुनर्रचना करणारच. पण तुम्ही कामाला लागा, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू प्रकरणी प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सत्यमेव जयते. या प्रकरणामुळे कुटुंबियांना किती मनस्ताप झाला हे लक्षात घ्या. केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. विनाकारण त्यांना बदनाम केले. षडयंत्र करणाऱ्यांचा चेहरामोहरा समोर आला आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: kishori pednekar told that shiv sena uddhav thackeray gave instructions about to get ready for next mumbai municipal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.