काळीपिवळी टॅक्सीही होणार हायटेक

By admin | Published: April 8, 2017 05:22 AM2017-04-08T05:22:23+5:302017-04-08T05:22:23+5:30

ओला, उबरच्या धर्तीवर मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपब्लध करुन देण्यासाठी खास अ‍ॅप बनवण्यात येईल

Kite Pipi will also be a taxi | काळीपिवळी टॅक्सीही होणार हायटेक

काळीपिवळी टॅक्सीही होणार हायटेक

Next

मुंबई : ओला, उबरच्या धर्तीवर मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपब्लध करुन देण्यासाठी खास अ‍ॅप बनवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या धंद्यावर ओला-उबर टॅक्सीमुळे संक्रात आली आहे, यासंदर्भात राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, ओला-उबरला ग्राहक पसंती देत असतील तर ती टॅक्सी धंद्यातील स्पर्धा आहे.
काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी विश्वासार्हता टीकवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले.
काळी-पिवळी टॅक्सीसाठी अ‍ॅप बनवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते, त्याचे काय झाले, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, पुढच्या तीन महिन्यात काळी-पिवळी टॅक्सीसाठी अ‍ॅप निर्माण करण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Kite Pipi will also be a taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.