कोथरूडमध्ये कीर्तनाची जुगलबंदी
By admin | Published: November 2, 2016 12:54 AM2016-11-02T00:54:44+5:302016-11-02T00:54:44+5:30
राजलक्ष्मी सभागृहात दिवाळीनिमित्ताने कीर्तन जुगलबंदी, मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम अॅड. अशोक प्रभुणे व डॉ. श्रद्धा पाठक-प्रभुणे यांनी आयोजित केला
कोथरुड : येथील राजलक्ष्मी सभागृहात दिवाळीनिमित्ताने कीर्तन जुगलबंदी, मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम अॅड. अशोक प्रभुणे व डॉ. श्रद्धा पाठक-प्रभुणे यांनी आयोजित केला होता.
चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि युवा कीर्तनकार श्रेयस व मानसी बडवे यांच्या कीर्तनाची जुगलबंदीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अंकुश तिडके यांनी केले.
युवराज मित्र मंडळाने परमहंसनगर येथे दीपोत्सव साजरा केला. संयोजन रवी दिघे, संगीता जगताप यांनी केले. श्री साईनाथ मंदिर शास्रीनगर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. संयोजन विलास मोहोळ, कैलास मोहोळ यांनी केले.
या वेळी सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम उपस्थित होते. सेंट क्रिस्मस होम शाळेतील अनाथ मुलांना खाऊवाटप कार्यक्रमाचे आयोजन संजय गांधी निराधार योजनेच्या कोथरूड विधानसभा विभागाचे सदस्य शिवाजी शेळके यांनी केले होते. या कार्यक्रमास आमदार मेधा कुलकर्णी, प्रकाश बालवडकर आदी उपस्थित होते.
मुकेश अनिवसे, सचिन खरात, तुषार पासलकर, शुभम लोयरे, प्रकाश काळोखे, अभिजित मुळे यांनी परिश्रम घेतले. श्रीराम प्रतिष्ठान बावधनच्या वतीने ‘सॅल्युट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमाअंतर्गत जवानांना पत्ररूपाने शुभेच्छा पाठविण्यात आल्या. गोरख दगडे यांनी संयोजन केले. नगरसेवक रामचंद्र कदम व वैशाली मराठे यांनी पाडवा पहाटचे आयोजन केले.