लग्नाच्या पार्टीत 'झिंगाट' गाण्यावरुन चाकू, कु-हाडीने वार, 9 जण रुग्णालयात

By admin | Published: March 9, 2017 01:16 PM2017-03-09T13:16:10+5:302017-03-09T13:16:10+5:30

मागच्यावर्षी तरुणाईने 'झिंग झिंग झिंगाट' गाण्याला अक्षरक्ष डोक्यावर घेतले. हेच गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले.

The knife, the bone and the bone, 9 people at the hospital, 'Zingat' singing at the wedding party | लग्नाच्या पार्टीत 'झिंगाट' गाण्यावरुन चाकू, कु-हाडीने वार, 9 जण रुग्णालयात

लग्नाच्या पार्टीत 'झिंगाट' गाण्यावरुन चाकू, कु-हाडीने वार, 9 जण रुग्णालयात

Next

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 9 - मागच्यावर्षी तरुणाईने 'झिंग झिंग झिंगाट' गाण्याला अक्षरक्ष डोक्यावर घेतले. हेच गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले. झिंगाट गाणे वाजवायचे की, जय जय महाराष्ट्र यावरुन झालेल्या वादातून दोन गटांनी परस्परांवर चाकू, कु-हाडीने वार केले. यात 9 जण जखमी झाले. डोंबिवलीच्या सागाव गावामध्ये राहणा-या रतन म्हात्रे यांनी मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने एक पार्टी दिली होती. त्यामध्ये 4 मार्च रोजी ही घटना घडली. 
 
पार्टीला आलेल्या पाहुणे मंडळीनी मद्यपान करुन रात्रभर डीजेच्या तालावर ठेका धरला होता. पहाटेच्या सुमारा नवरदेवाच्या मित्रांना झिंगाट गाण्यावर नाचायचे होते. पण झिंगाट गाणे भरपूरवेळा वाजवल्यामुळे आता जय जय महाराष्ट्र गाण्यावर नाचण्याची इच्छा अन्य पाहुण्यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजूंमध्ये यावरुन सुरु असलेल्या शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. 
 
पाहुणेमंडळींवर मद्याचा अंमल असल्यामुळे कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी थेट चाकू, कु-हाडी काढून परस्परांवर वार केले आणि लग्नमंडप अक्षतांऐवजी रक्ताने लाल झाला.  घटनास्थळी आम्ही पोहोचलो तेव्हा कोणी काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते असे मानापाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजनान काबडुले यांनी सांगितले. या हाणामारीमध्ये नऊजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
 

Web Title: The knife, the bone and the bone, 9 people at the hospital, 'Zingat' singing at the wedding party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.