जाणून घ्या, नवऱ्याला भक्कम साथ देणाऱ्या धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 07:13 PM2019-03-12T19:13:23+5:302019-03-12T19:18:44+5:30

स्वतःची अशी राजकीय पार्श्वभूमी नसताना नवऱ्याच्या मागे सावलीप्रमाणे खंबीरपणे उभ्या असलेल्या धनश्री यांच्याबाबत सर्वत्र  बोलले जात आहे. 

Know more about Mrs Dhanashri Sujay Vikhe Patil | जाणून घ्या, नवऱ्याला भक्कम साथ देणाऱ्या धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयी !

जाणून घ्या, नवऱ्याला भक्कम साथ देणाऱ्या धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयी !

googlenewsNext

पुणे : आज दुपारपासून सुजय विखे पाटील यांच्यासोबत माध्यमात झळकणाऱ्या धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयीची चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. स्वतःची अशी राजकीय पार्श्वभूमी नसताना नवऱ्याच्या मागे सावलीप्रमाणे खंबीरपणे उभ्या असलेल्या धनश्री यांच्याबाबत सर्वत्र  बोलले जात आहे. 

             राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर भाजपमध्ये दाखल झालेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील सध्या महाराष्ट्रात सर्वांत चर्चेत आहेत. विखे घराण्यापासून ते राजकीय अंदाजापर्यंत सर्व मुद्द्यांवर त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा आहे. मात्र या चर्चेत कुटुंबाच्या विरोधात जाऊन सुजय यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी धनश्री ठामपणे त्यांच्यासोबत आहेत.

                  मूळ औरंगाबादचे माहेर असलेल्या धनश्री यांचे आडनाव कुंजीर आहे. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक असून घरात पाच काकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे. लग्नापूर्वी बी.सी.एस.आणि नंतर फायनान्समध्ये एमबीए केलेल्या त्या  २०१० साली डॉ. सुजय यांच्याशी विवाहबद्ध होऊन विखे पाटील कुटुंबात आल्या. या दांपत्याला अनिशा नावाची मुलगी आहे. स्वभावाने शांत असलेल्या धनश्री सुरुवातीला फारशा ऍक्टिव्ह नव्हत्या. पण काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या सासूबाई आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी सुरु केलेल्या रणरागिणी महिला बचत गटात लक्ष घालण्यास त्यांनी सुरुवात केली. सध्या या गटाच्या त्या अध्यक्षा आहेत. याशिवाय एक शाळाही चालवतात. सुसंवादी, सुसंस्कृत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वहिनी आणि ताई या नावाने परिचित आहे. सुजय यांच्या प्रवेशानंतर त्यांच्यासोबत राहून प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

Web Title: Know more about Mrs Dhanashri Sujay Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.