जाणून घ्या दबावाखालील पृथ्वी
By admin | Published: July 14, 2016 08:09 PM2016-07-14T20:09:02+5:302016-07-14T20:09:02+5:30
मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही वसुंधरेची वाटचाल दिवसेंदिवस मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून
रमण विज्ञान केंद्रात प्लॅनेट अंडर प्रेशर : मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून बिकटतेकडे वाटचाल
नागपूर : मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही वसुंधरेची वाटचाल दिवसेंदिवस मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून बिकटतेकडे होत आहे. बेसुमार जंगलतोड, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, अतिऔद्योगिकीकरण, वातानुकूलित उपकरणांचा उपयोग, वाहनांचा वाढता वापर आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती आदी अनेक कारणांच्या दबावाखाली पृथ्वी आली आहे. याबाबत जनजागृती निर्माण करून त्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्याची माहिती देणारे प्रदर्शन ह्यप्लॅनेट अंडर प्रेशरह्ण रमण विज्ञान केंद्रात सुरू झाले आहे.
या प्रदर्शनात विविध थ्रीडी मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. माहिती देणारे पॅनल्स, (माहिती पटल) व्हिडिओ, ह्यअॅनिमेशन डेस्कह्ण याद्वारे विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती देताना रमण विज्ञान केंद्राचे अधिकारी अभिमन्यू भेलावे म्हणाले, विकासाच्या नावाखाली शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत आहे. आज वीज नसेल तर हवा, पाणी आणि अन्न बंद अशी स्थिती महानगरांची झाली आहे, हे आजचे वास्तव आहे. या सर्वांचा दबाव पृथ्वीवर पडत आहे. सूर्यापासून जी उष्णता मिळते पृथ्वी ती काही प्रमाणात शोषून घेते व थोड्या प्रमाणात बाहेर टाकते. परंतु आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने व कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे शोषलेले तापमान पुरेशा प्रमाणात टाकण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून ह्यग्लोबल वॉर्मिंगह्णला सामोरे जावे लागत आहे. दुसरे म्हणजे, पृथ्वीला थंड कसे राखायचे हाही एक दबावाचा भाग आहे. हा दबाव कमी करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी वैकल्पिक साधने काय, या सर्वांची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घराघरात पोहचावे यासाठी हे प्रदर्शन आहे.