कोकण, विदर्भात मुसळधार
By admin | Published: July 2, 2015 12:58 AM2015-07-02T00:58:24+5:302015-07-02T00:58:24+5:30
राज्यात गेल्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात मान्सून सक्रीय असल्याने मुसळधार पाऊस झाला. देवगडमध्ये २०० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पुणे : राज्यात गेल्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात मान्सून सक्रीय असल्याने मुसळधार पाऊस झाला. देवगडमध्ये २०० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून पाऊस गायब झाला आहे. गेल्या २४ तासांत मालवणमध्ये ९० मिमी, कणकवलीमध्ये ८० मिमी, वाशिम ७० मिमी तर कुडाळ, रत्नागिरी, हर्णे, वणी येथे ६० मिमी आणि श्रीवर्धन, गुहाघर, लाखांदूर येथे ४० मिमी पाऊस झाला.
सावंतवाडी, महाड, संगमेश्वर, राजुरा, देवरी, मंगरूळपीर, सालेकसा येथे ३० मिमी, राजापूर, दापोली, वेंगुर्ला, महाबळेश्वरला २० मिमी, चिपळूण, कर्जत, पेण, रोहा, पोलादपूर, श्रीरामपूर, पाथरी, भामरागड, चंद्रपूर, गडचिरोली येथे १० मिमी पावसाची नोंद झाली.
पुढील ४८ तासांत राज्यात कोठेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)