कोल्हापूर : अमित शहा यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 07:27 PM2019-08-11T19:27:03+5:302019-08-11T19:28:16+5:30
कर्नाटकमधील आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यापर्यंत पूरस्थिती झाली होती.
मुंबई : कोल्हापूर, सांगलीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पूरस्थिती असून बराच भाग पाण्याखाली गेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकमधील पूरस्थितीची हवाई पाहणी केली.
कर्नाटकमधील आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यापर्यंत पूरस्थिती झाली होती. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्य़ाने महाराष्ट्रातील सीमाभागात पाण्याचा फुगवटा वाढला आहे. यामुळे कोल्हापुरातून जाणारा पुणे-बंगळुरू महामार्ग आठ फूट पाण्यात होता.
#WATCH: Union Home Minister Amit Shah conducting an aerial survey of flood-hit areas of Karnataka and Maharashtra. Karnataka Chief Minister BS Yediyurappa also present. pic.twitter.com/ORTQbOYR7g
— ANI (@ANI) August 11, 2019
या पूरस्थितीची अमित शहा यांनी हवाई पाहणी केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूरमधील महामार्गावरील पाण्यातूनच अत्यावश्यक सेवेचे इंधनाचे टँकर रवाना करण्यात आले.