कोल्हापुरात काँग्रेसला तीन

By admin | Published: March 15, 2017 12:24 AM2017-03-15T00:24:46+5:302017-03-15T00:24:46+5:30

जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सभापती निवडीत कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन सभापती झाले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन ठिकाणी

In Kolhapur, Congress has three | कोल्हापुरात काँग्रेसला तीन

कोल्हापुरात काँग्रेसला तीन

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सभापती निवडीत कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन सभापती झाले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन ठिकाणी, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य आणि स्थानिक शाहू आघाडीला प्रत्येकी एका ठिकाणी सभापती बनविण्याची संधी मिळाली आहे.
गेल्या दोन दिवसांत प्रचंड राजकीय उलथापालथी होत जिल्ह्यातील राजकारणामध्ये काहीही होऊ शकते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. चक्क राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत गडहिंग्लजमध्ये सत्ता स्थापन करताना दुसरीकडे भाजप, स्वाभिमानी आणि कॉँग्रेस यांनी एकत्र येत ‘स्वाभिमानी’चा केवळ एकच सदस्य असताना, त्यालाच सभापती करण्याची ‘राजकीय दानशूरता’ही चंदगड येथे दाखविण्यात आली आहे!
कागलमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या कमल पाटील या सभापती, तर राष्ट्रवादीचे रमेश तोडकर बिनविरोध उपसभापती बनले.
शिरोळमध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होऊन तेथे कॉँग्रेसचे मल्लाप्पा चौगुले यांची सभापतिपदी व उपसभापतिपदी शिवसेनेच्या कविता चौगुले यांची निवड झाली. गडहिंग्लजमध्ये अनपेक्षितपणे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने भाजपच्या जयश्री तेली यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीच्या बानश्री चौगुले यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. चंदगडमध्ये मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या असून येथे स्वाभिमानीचे एकमेव सदस्य असलेले जगन्नाथ हुलजी हे सभापती झाले आहेत.

Web Title: In Kolhapur, Congress has three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.