विशाळगडावरील तोडफोडीनंतर शिवभक्तांवर गुन्हे, संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 03:02 PM2024-07-15T15:02:08+5:302024-07-15T15:28:30+5:30

Kolhapur News: रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५०० हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले आहे. तर शाहूवाडी पोलिसांकडून संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. 

Kolhapur: Crimes against Shiva devotees after vandalism at Vishalgarh, Sambhaji Raje Chhatrapati arrested by police | विशाळगडावरील तोडफोडीनंतर शिवभक्तांवर गुन्हे, संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर

विशाळगडावरील तोडफोडीनंतर शिवभक्तांवर गुन्हे, संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर

स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांपासून धुमसत आहे. या अतिक्रमणांविरोधात कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी विशाळगडाच्या दिशेने कूच करण्याचा इशाराही दिला होता. यादरम्यान, रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ५०० हून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केले होते. तसेच काहींची धरपकडही केली होती. पोलीस आणि प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. 

याबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की,  काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असं आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. 

त्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी शिवभक्तांवर केलेल्या कारवाईबाबत पोलिसांसोबत चर्चा केली. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही  कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.  

Web Title: Kolhapur: Crimes against Shiva devotees after vandalism at Vishalgarh, Sambhaji Raje Chhatrapati arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.