कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे

By Admin | Published: November 2, 2015 10:34 AM2015-11-02T10:34:48+5:302015-11-03T11:47:18+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने मुसंडी मारली असून राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेस महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

In Kolhapur, the leader of the power of the coalition | कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे

कोल्हापूरमध्ये सत्तेची चावी आघाडीकडे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. २ - कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसने मुसंडी मारली असून राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेस महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.  भाजपा ताराराणी आघाडीने ३२ जागांवर आघाडी घेतली असली तरी सत्तेसाठीची मॅजिक गाठण्यात भाजपाला अपयश आले. 
कोल्हापूर महापालिकेतील ८१ जागांसाठी रविवारी मतदान झाले असून तब्बल ६९ टक्के मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे ५०७ मतदार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोल्हापूरमध्ये ८१ पैकी काँग्रेसने २७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपा - ताराराणी आघाडी ३२, राष्ट्रवादी काँग्रेस १५, शिवसेना ४ व अन्य पक्ष ३ जागेवर आघाडीवर आहे. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास अनुकूल असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.  भाग क्रमांक ३९ - राजारामपुरी एक्स्टेंशन येथून राष्ट्रवादीचे मुरलीधर जाधव विजयी झाले असून प्रभाग क्रमांक २३ - रुईकर कॉलनी येथून भाजपाच्या उमा इंगळे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते राजेश लाटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपा - ताराराणी आघाडीच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांचा पराभव केला 
 

Web Title: In Kolhapur, the leader of the power of the coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.