नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 09:06 AM2024-05-02T09:06:45+5:302024-05-02T09:07:29+5:30

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ - शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला. 

Kolhapur Lok Sabha Constituency - Sharad Pawar targeted Prime Minister Narendra Modi for criticizing the India Alliance | नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

कोल्हापूर - Sharad Pawar on Narendra Modi ( Marathi News ) ५ वर्षात ५ पंतप्रधान असा जावईशोध नरेंद्र मोदींनी कुठून लावला? इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा नाही. पुरेसे संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ असं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास ५ वर्षात ५ पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधानांनी कुठून लावला?, आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. १९७७ साली जेपी नारायण यांच्याकडे लोक आकर्षित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला, तुमचा नेता कोण असं तेव्हा विचारले जायचे. तेव्हा मोरारजी देसाई यांचं नाव निवडणुकीनंतर पुढे आले. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल. त्याला पूर्ण सहकार्य देत स्थिर सरकार देत अखंड ५ वर्ष चालवलं जाईल. त्यामुळे ५ वर्ष ५ पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली. आमच्या डोक्यात नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय मोदींना समाधान वाटत नाही. त्यांची स्टाईल आहे, कोल्हापूरात आले तर नमस्कार कोल्हापूरकर असं बोलून सुरुवात करणार. पहिले ३-४ वाक्य त्यांचे स्थानिक नेते लिहून देतात ते बोलतात, कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचे नाव घेतले नाही, भाषणात कराडचा उल्लेख केला नाही, सातारचा केला असा टोला शरद पवारांनी लगावला. 

दरम्यान, विदर्भात उमेदवार प्रभावी असून ५० टक्क्यांच्या आत मतदान झालं, लोक उदासीन असतील किंवा आम्हा लोकांच्या कामामुळे अस्वस्थ असतील, अथवा वातावरणामुळेही मतदान कमी झालं असावं. आता मतदानाची टक्केवारी वाढतेय. या देशात अलीकडच्या काळात वास्तवता, सत्य लपवणारा पंतप्रधान पाहिले नाही. पंतप्रधान मोदी भाषणात खोट्या गोष्टी सांगतात. त्यांच्याकडे लोकांचे समाधान करण्याची खात्री दिसत नाही. त्यामुळे मूळ मुद्दे बाजूला ठेवून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न मोदींकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे लोक फारसं लक्ष देत नाही असंही पवार म्हणाले. 

धर्माच्या आधारे आरक्षण मान्य नाही 

धर्माच्या आधारे आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. हे कुणी केले तर त्याविरोधात संघर्ष करू. आता जातीय जणगणना करण्याची मागणी त्यामागील मुख्य कारणे समाजातील वंचित, शोषित घटकांची संख्या किती, त्यांच्यापर्यंत योजना पोहचवण्यासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानासारख्या व्यक्तीला केरळ, कर्नाटक यासारख्या दक्षिणेकडील राज्यात जास्त प्रतिसाद नाही. लोक त्यांना स्वीकारत नाहीत असं सांगत शरद पवारांनी धर्माच्या आधारे आरक्षणावरील टीकेवर प्रत्युत्तर दिले. 

शेती अन् ऊसाबद्दल पंतप्रधान अज्ञानी

एफआरपी ही पद्धत आम्ही सुरू केली, ते मोदींना माहिती नाही. त्यात आपोआप वाढ होत राहते, त्यामुळे त्यात सरकारला भाव ठरवावा लागत नाही. ऊस आणि शेती याबद्दल पंतप्रधानांना मर्यादित ज्ञान आहे असंही शरद पवारांनी म्हटलं. 
 

Web Title: Kolhapur Lok Sabha Constituency - Sharad Pawar targeted Prime Minister Narendra Modi for criticizing the India Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.