कोल्हापूर : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक : ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता सदाभाऊ खोत यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:41 PM2018-10-30T18:41:31+5:302018-10-30T18:44:39+5:30
या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.
कोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.
खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे.
हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.
दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.
तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवान
जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.
मी हातकणंगलेतूनच
सदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.
नियमनमुक्ती शेतकऱ्यांच्या फायद्याची
शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली.
सुधारित : बॅँकांकडून साखर तारणावर ९० टक्के कर्ज
सदाभाऊ खोत यांची माहिती : आता पंधरा दिवस ‘आंदोलना’चे नाटक
(खोत यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ऊसदराबाबत १५ दिवस आंदोलनाचे नाटक चालणार, असा टोलाही त्यांनी ‘स्वाभिमानी’चे नाव न घेता लगावला.
खोत म्हणाले, ‘ऊसदराच्या ‘एफआरपी’संदर्भात रयत क्रांतीच्या परिषदेमध्ये केलेली मागणीच जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये करण्यात आली. यावरून आपण यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे हे आपल्याला माहीतच होते व यावरून आपणच या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचे म्हणणे खरे ठरले आहे. रिकव्हरीचा साडेनऊचा बेस संपविला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण ‘एफआरपी’चे पैसे देताना १० टक्के रिकव्हरीचे पैसे द्यावेत, असेच सूत्र करण्यात आले आहे. हे जर चुकीचे वाटत असेल तर खासदार शेट्टी यांनी केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाकडे मागणी करायला हवी होती. खासदार म्हणून ते त्यांनी ते मांडायला हवे होते; परंतु तसे न करता ते उलट रस्त्यावर येत आहेत. जयसिंगपूरची परिषद ही ‘सदाभाऊ बेस्ड’च होती. माझ्या पोस्टरला मारलेले चाबकाचे फटकारे म्हणजे मी अजून ही त्यांच्या मनामनांमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे.
दिवाळीच्या तोंडावर ऊस आंदोलनाचे नाटक पंधरा दिवस चालणार आहे. लोकांना भावनिक आवाहन केले जाणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. दिवाळीनंतर ऊसतोड कामगार येतील व कारखानेही सुरू होतील. अडचणी असल्यास कारखाने सरकारकडे मदतही मागतील व त्यातून मार्ग निघाल्यास हे आपणच केले म्हणून ढोल बडवतील असाही टोला खोत यांनी लगावला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, बी. एस. पाटील उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------
तूपकर म्हणजे तर नारळावर कुस्ती करणारा पैलवान
जयसिंगपूरच्या परिषदेमध्ये रविकांत तूपकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला आता दाढी आली आहे; माझी पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे; तूपकर म्हणजे नारळावर कुस्ती करणारा पैलवान आहे. त्याला फार महत्व द्यायचे कारण नाही.
----------------
मी हातकणंगलेतूनच
सदाभाऊ खोत यांनी कोडोलीच्या ऊस परिषदेतहीत हातकणंगलेतून निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:हून हातकणंगलेमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा जाहीर केले.
------------------------------------------------------------------------------
नियमनमुक्ती शेतकºयांच्या फायद्याची
शेतकºयांचा संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावा, अशी मागणी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्यापासून आम्ही करीत होतो. मध्यंतरीच्या काळात काही शेतीमाल नियमनमुक्त केला. आता सर्वच शेतीमाल नियमनमुक्त शेतकºयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे, अशी माहिती खोत यांनी दिली.
-----------------------------------------------------