इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला; प्रशांत कोरटकर पसार, मोबाईल स्विच ऑफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:10 IST2025-02-27T13:54:01+5:302025-02-27T14:10:09+5:30
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दोन दिवसापूर्वी नागपूर येथील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले होते.

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला; प्रशांत कोरटकर पसार, मोबाईल स्विच ऑफ
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दोन दिवसापूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले. दरम्यान, आता कोल्हापूरपोलिसांचे एक पथक नागपूरकडे रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकर याच्या शोधासाठी कोल्हापूरहूननागपूरमध्येपोलिसांचे पथक पोहोचले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार झाला आहे. त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ लागत असून त्याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा फोन बंद असल्याची माहिती नागपूरमधील बेलतरोडी पोलिसांनी दिली आहे.
बसचा लॉक केलेला दरवाजा उघडला कसा?; स्वारगेट बलात्कार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर
पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल स्विचऑफ असल्याने तो लपलेल्या ठिकाणाची माहिती मिळालेली नाही. त्याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे. समन्वयातून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी कोरटकर याच्या घरासमोर काही तरुणांनी घोषणाबाजी केली. कायदासुव्यवस्था राखण्यासाठी त्याच्या घरासमोर बंदोबस्तात तैनात केल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आता प्रशांत कोरटकर याच्या मोबाईलच्या लोकेशनने शोध सुरू केला आहे. कोल्हापुरातून पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकामध्ये पाच पोलिसांचा समावेश असून पोलीस त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मोबाईल स्विच ऑफ असल्याने अद्याप माहिती मिळालेली नाही. प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे कोल्हापूरात संताप व्यक्त करण्यात आला.
कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या घरात पोहोचले आहे, त्यांनी चौकशी केली आहे.