कोल्हापूर : पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासरा अटकेत, त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:11 AM2017-09-06T02:11:49+5:302017-09-06T02:12:01+5:30
खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील बावड्या पिताजी शिंदे (वय २५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. ३) आत्महत्या केली होती.
लोणंद (कोल्हापूर) : खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील बावड्या पिताजी शिंदे (वय २५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. ३) आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बावड्या शिंदे याची पत्नी व सासºयाला सोमवारी अटक केली असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. चलापी बावड्या शिंदे व लत्या इसम काळे (६५, रा. कोकराळे) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
पिंपरे बु्रदुक येथील बावड्या शिंदे याने रविवारी गावातील एका लिंबाच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच शिंदे आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तुफान दगडफेक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगविला होता. दरम्यान, बावड्या शिंदे याची पत्नी चलापी शिंदे ही वेश्या व्यवसाय करीत असून, तिला तिचे वडील लत्या काळे व दोन भाऊ निकल व नव्या काळे मदत करीत असल्याचे आरोप बावड्या शिंदे याने केला होता.
यामुळे चिडून जाऊन संबंधितांनी बावड्या शिंदे यास मारहाण करून दमदाटी केली होती. या त्रासाला कंटाळून बावड्या शिंदे याने आत्महत्या केल्याचे चकू पिताजी शिंदे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चलापी शिंदे व लत्या काळे यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे करीत आहेत.