कोल्हापुरी राहीचा ‘सुवर्ण’वेध

By admin | Published: July 27, 2014 02:48 AM2014-07-27T02:48:28+5:302014-07-27T02:48:28+5:30

कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या यशाच्या नौबती यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही झडल्या. नेमबाजीत तिने भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले.

Kolhapuri Rahi's 'gold' gesture | कोल्हापुरी राहीचा ‘सुवर्ण’वेध

कोल्हापुरी राहीचा ‘सुवर्ण’वेध

Next
राष्ट्रकुल स्पर्धेत कोल्हापूर : 25 मीटर पिस्तूल प्रकारात मिळविले यश, पुण्याच्या अनिसाला रौप्य
ग्लास्गो : कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या यशाच्या नौबती यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही झडल्या. नेमबाजीत तिने भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. आज, शनिवारी झालेल्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात तिने भारताच्याच अनिसा सय्यदला मागे टाकत सुवर्णपदकावर नेम साधला. 
सेमीफायनलमध्ये राहीला अनिसाने तगडी झुंज दिली; परंतु राहीने 16 गुणांसह बाजी मारली, तर अनिसाचे 14 गुण झाले. अंतिम फेरीत तिने अनिसावर एकतर्फी वर्चस्व गाजविले. राहीला आठ, तर अनिसाला दोन गुण मिळाले. 
नेमबाजीतच अपूर्वी चंदेलाने स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर अयोनिका पॉलने रौप्यपदकाचा मान मिळविला. प्रकाश नंजप्पाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. राजविंदर कौरने ज्युदोमध्ये कांस्यपदक पटकावले. 
 
ग्लास्गो : भारताच्या महिला नेमबाज अपूर्वी चंदेला आणि राही सरनोबत यांनी 2क्व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तिस:या दिवशी शनिवारी नेमबाजीत सुवर्णमय कामगिरी करीत दोन सुवर्णपदकांची कमाई करून दिली. याशिवाय प्रकाश नांजप्पा, अयोनिका पाल आणि अनिसा सय्यद यांनी रौप्य पदके जिंकली. महिलांच्या ज्यूदो प्रकारात भारताच्या राजविंदर कौरला 48 किलो गटात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात राहीने सुवर्णपदकाच्या लढतीत अनिसाला 8-2 गुणांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या ललिता यौहेलुस्कायाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मूळची कोल्हापूरची असलेली आणि पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करीत असलेल्या 23 वर्षीय राही आणि 33 वर्षीय अनिसा उपांत्यफेरीत अनुक्रमे पहिल्या व दुस:या क्रमांकावर होत्या, ज्यामुळे अंतिम लढत या दोघींमध्ये होती. राहीने 2क्1क् राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण जिंकली होती. गेल्यावर्षी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकून पहिली भारतीय पिस्टल नेमबाज ठरली होती. अनिसानेसुद्धा 2क्1क् राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण जिंकली होती. 
अपूर्वी चंदेला हिने अभिनव बिंद्राच्या पावलावर पाऊल टाकून दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकले. तिने पात्रता आणि मुख्य स्पर्धेत नव्या विक्रमासह सुवर्णपदक जिंकले हे विशेष. याच प्रकारात अयोनिका पाल ही रौप्य पदकाची मानकरी ठरली. भारताने एकाच दिवशी नेमबाजीत पदकांची लयलूट करण्याची आगळीवेगळी कामगिरी केली. प्रकाश नांजप्पाने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात चढाओढ करीत रौप्यपदक पटकावले. 
भारताला नेमबाजीत तीन सुवर्ण आणि चार रौप्य मिळाली असल्याने एकूण पाच सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यांसह पदकांची संख्या 15 झाली आहे.
 अपूर्वी चंदेलाने भारताचा महान नेमबाज अभिनव बिंद्राचा कित्ता गिरविताना 1क् मीटर एअर रायफल महिला स्पर्धेत शनिवारी पात्रता व अंतिम फेरीत नवा विक्रम नोंदविताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत अयोनिका पॉलने रौप्यपदकाचा मान मिळविला. 
प्रकाश नांजप्पाने पुरुषांच्या 1क् मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रंगतदार लढतीत रौप्यपदक पटकाविले. भारताने नेमबाजीमध्ये आतार्पयत दोन सुवर्ण व तीन रौप्यपदकांची कमाई केली आहे. भारताने एकूण 4 सुवर्ण, 6 रौप्य व तीन कांस्यपदकांसह एकूण 13 पटके पटकाविली आहेत. 
अपूर्वी चंदेलाने 415.6 गुणांचा नवा स्पर्धा विक्रम नोंदवित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. पात्रता फेरीत अपूर्वीने अव्वल स्थान पटकाविले. पात्रता फेरीत 413.2 गुणांसह चौथे स्थान पटकाविताना अयोनिका पॉल अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. दोन्ही नेमबाजांनी अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करताना भारताला सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करून दिली. या स्पर्धेत भारताने प्रथमच एकाच क्रीडा प्रकारात सुवर्ण व रौप्य पदक पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजस्थानातील जयपूरनिवासी 21 वर्षीय अपूर्वीने 2क्6.7 गुणांसह अंतिम फेरीत नवा स्पर्धा विक्रम नोंदविताना सुवर्णपदक पटकाविले. मुंबईच्या अयोनिकाने 2क्4.9 गुणांसह रौप्यपदकाचा मान मिळविला तर मलेशियाच्या नूर सुरयानी मोहम्मद तैबी हिने 184.4 गुणांसह कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत न्यूरचे कांस्यपदक निश्चित झाल्यानंतर भारतीय तंबूत आनंदाला उधाण आले. (वृत्तसंस्था)
 
टेटे : भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत
4भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आज राष्ट्रकुल स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात शामिनी कुमारसेनची कामगिरी उल्लेखनीय ठरली. 
4भारतीय संघाला उपांत्य फेरीत सिंगापूरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला सिंगापूरविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 
4शामिनीने एकेरीच्या पहिल्या लढतीत 52 वर्षीय चुन लीविरुद्ध खेळण्याचा निर्णय योग्य ठरला. भारतीय खेळाडूने 2क्क्2 च्या एकेरीतील चॅम्पियन खेळाडूचा 5-11, 11-9, 11-5, 11-5 ने पराभव केला. 
4दिल्लीच्या मनिका बत्रने चुन लीची बहीण कारेनचा 11-13, 11-9, 11-5, 11-5 ने पराभव करीत भारताला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीमध्ये शामिली व मधुरिका पाटकर यांनी कारे व यांग सुन यांचा 11-8, 11-8, 11-8 ने पराभव केला. 
 
राष्ट्रकुल बॉक्सिंग : विंजेदर, मनोजचा शानदार विजय
ग्लास्गो : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग व मनोज कुमार यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत शानदार सुरुवात केली. विजेंदरने 75 किलो वजन गटात अॅण्डय़्रू कोमेटाचा तर मनोज कुमारने 64 किलो वजन गटात लेसोथो मोकाचाने मोशोशूचा याच फरकाने पराभव करीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
 
सरावात खंड पडूनही सुंदर कामगिरी
दोन महिन्यांपूर्वी हात फ्रॅक्चर झाल्याने सराव बंद होता. मात्र, स्पर्धेपूर्वी तिचे युक्रेनचे 78 वर्षीय कोच अनोतोली यांनी तिचा भारतात आठ दिवस आणि जर्मनी येथील सराव शिबिरात 15 दिवस सराव करून घेतला. त्यामुळे तिच्या कष्टाचे चीज आज तिने ग्लासगोत सुवर्णपदक पटकाविल्याने झाले, असे वाटते. - जीवन सरनोबत, राहिचे वडील 
 

 

Web Title: Kolhapuri Rahi's 'gold' gesture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.