कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार

By admin | Published: October 5, 2015 02:41 AM2015-10-05T02:41:11+5:302015-10-05T02:41:11+5:30

राज्याच्या अनेक भागांत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवार व रविवारीही अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली

Konkan and the central state of Maharashtra | कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार

कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार

Next

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवार व रविवारीही अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तथापि, रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला होता. तर राज्यभरात वीज कोसळून सहा जणांचे बळी गेले.
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणात बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हर्णे येथे सर्वाधिक ९० मिमी पावसाची नोंद झाली. भिवंडी, पेण, पनवेल, अलिबाग, कुलाबा, ठाणे याभागात ६० ते ७० मिमी पाऊस पडला. तसेच मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भ व मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस पडला. तर रविवारी प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद उस्मानाबाद येथे ३८ मिमी इतकी झाली.
सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वीज कोसळून एका कुटुंबातील काका-पुतणीसह तिघांचा बळी गेला. तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ऊसतोडणी मजुराचा तर श्रीगोंदा येथे एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला़ बीड जिल्ह्यात वीज पडून एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.

Web Title: Konkan and the central state of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.